अहमदाबाद : विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतने केल्या काही महिन्यात भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाला विजय मिळवून देणारी फलंदाजी केली होती. त्याच बरोबर विकेटच्या मागे देखील तो चांगली कामगिरी करत आहे. वाचा- भारतीय संघाचा सलामीवर रोहित शर्माच्या मते पंतला नैसर्गिकपणे खेळण्याची परवानगी दिली तर तो चौथ्या कसोटी प्रमाणे पुन्हा शानदार फलंदाजी करू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत असताना पंतने शतक केले होते. वाचा- उद्यापासून १२ मार्च भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-२० मालिका सुरू होणार आहे. निवड समितीने त्याच्या शानदार कामगिरीमुळे पुन्हा एकदा संघात स्थान दिले. टी-२० मालिकेआधी पत्रकार परिषदेत बोलताना रोहित म्हणाला, पंतला पंतच राहू द्या. जर तसे झाले तर चौथ्या कसोटी प्रमाणे तो पुन्हा कामगिरी करेल. मी याआधी देखील सांगितले होते की, पंतला एकटे सोडून द्या. मगच तो चांगली कामगिरी करेल. वाचा- गेल्या दोन महिन्यात ऑस्ट्रेलियापासून ते आतापर्यंत तो शानदार खेळत आहे. त्याच्यावर अनावश्यक दबाव टाकण्याची गरज नाही, असे रोहित म्हणाला. वाचा- पंतला पंतच राहू द्या. त्याला खेळाचा आनंद घेण्यास आवडतो. भारतीय संघ व्यवस्थापनाची देखील हिच इच्छा आहे की, मैदानावर जा आणि खेळाचा आनंद घ्या, तुम्हाला जे आवडते ते करा. पंतने आता मॅचमधील परिस्थिती कशी आहे हे समजून घेण्यास सुरूवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून हे दिसून आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rBL3pC
No comments:
Post a Comment