मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये आजचा दिवस ११ मार्च हा दिवस खास असा आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणारे आणि विक्रम स्वत:च्या नावावर करणारे () यांचा आज जन्मदिवस आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या विजय हजारे यांनी अशी कामगिरी केली ज्याची आठवण आज देखील काढली जाते. वाचा- विजय हजारे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५८.३८च्या सरासरीने १८ हजार ७४० धावा केल्या. यात १० द्विशतकाचा समावेश होता. इतक नव्हे तर रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वप्रथम त्रिशतक करण्याचा विक्रम देखील विजय हजारे यांच्या नावावर आहे. त्यांनी महाराष्ट्राकडून खेळताना बडोदाविरुद्ध नाबाद ३१६ धावा केल्या होत्या. विजय हजारे यांच्याबद्दलची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांच्या कुटुंबातील चार पिढ्यांनी क्रिकेट खेळले आहे. विजय हजारे याचे भाऊ विवेक हजारे, मुलगा रंजीत हजारे आणि नातू कुणार हजारे हे क्रिकेट खेळले आहेत. वाचा- भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांनी १९४३-४४ साली द रेस्ट्स कडून खेळताना द हिंदुज विरुद्ध नाबाद ३०९ धावा केल्या होत्या. या सामन्यात विजय हजारे यांच्या संघाने ३८७ धावा केल्या होत्या. वाचा- देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक त्यांच्या नावावर आहे. इतक नव्हे तर कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक करणारे देखील ते पहिले भारतीय आहेत. १९४७-४८ मध्ये त्यांनी एडिलेड कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११६ आणि १४५ धावा केल्या होत्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ५० शतक करणारे ते पहिले फलंदाज आहेत. वाचा- विजय हजारे यांनी भारताकडून ३० कसोटीत २ हजार १९२ धावा केल्या. यात ७ शतक आणि ९ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणीतील २३८ सामन्यात त्यांनी ६० शतक, ७३ अर्धशतकांसह १८ हजार ७४० धावा केल्या. फलंदाजी प्रमाणे गोलंदाजीत देखील त्यांनी कमाल केली होती. कसोटीत त्यांनी २० विकेट घेतल्या होत्या. २९ धावात चार विकेट ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. तर प्रथम श्रेणीत ९० धावात ८ विकेट अशी सर्वोत्तम गोलंदाजी होती. या प्रकारात त्यांनी ५९५ विकेट घेतल्या होत्या. >> भारतात त्यांच्या नावाने दर वर्षी विजय हजारे ट्रॉफीचे आयोजन केले जाते. >> एका कसोटी सामन्यात दोन्ही डावात शून्यावर बाद होणारे ते पहिले भारतीय होते. >> १९४७ साली रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विजय हजारे आणि गुल मोहम्मद यांनी ५७७ धावांची भागिदारी केली होती. हा विक्रम अनेक वर्ष कायम होता. २००६ साली कुमार संगकारा आणि माहेला जयवर्धने यांनी ६२४ धावा करत हा विक्रम मोडला. >> कसोटी क्रिकेटमध्ये १ हजार धावा पूर्ण करणारे ते पहिले फलंदाज होते. >> पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले ते पहिले क्रिकेटपटू होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rFWPz5
No comments:
Post a Comment