अबुधाबी : अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे (Afghanistan vs Zimbabwe) यांच्यात पहिली कसोटी युएईमध्ये सुरू आहे. अफगाणिस्तानचा पहिला डाव फक्त १३१ धावात संपुष्ठात आला. तर झिम्बब्वेने पहिल्या डावात २५० धावा करत आघाडी घेतली. वाचा- जागतिक क्रिकेटमध्ये हे दोन्ही संघ दुबळे आहेत. पहिल्या कसोटी अफगाणिस्तानच्या डावातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. झिम्बाब्वेचा गोलंदाज व्हिक्टर नेयुची एका चेंडूवर विकेट घेतली. आयसीसीने त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेयुचीने हशमतुल्लाह शाहिदीची बोल्ड काढली. त्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल... वाचा- नेयुचीने टाकलेला हा यॉर्कर चेंडू खेळण्यात शाहिदी चुकला आणि तो बोल्ड जाला. त्याचा चेंडू इतका घातक होता की तीन पैकी दोन विकेट पडल्या. शाहिदीला देखील विश्वास झाला नाही की नेमके काय झाले. वाचा- आयसीसीने झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाचे कौतुक केले आहे. २०१३ नंतर प्रथमच झिम्बाब्वेच्या जलद गोलंदाजांनी एका डावात ८ विकेट घेतल्या असतील. अबुधाबीत कसोटीच्या पहिल्या डावात एखाद्या संघाने केलेल्या या सर्वात कमी धावा आहेत. याआधी २०१८ साली पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने १५३ धावा केल्या होत्या. वाचा- पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात देखील अफगाणिस्तानची दाणादाण उडाली आहे. ४७ धावांवर त्यांचे ६ फलंदाज बाद झाले होते. ते अद्याप ७० धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे या सामन्यात झिम्बाब्वे विजय मिळवणार असे दिसतय.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sLsrn2
No comments:
Post a Comment