अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ()ला इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात काही विक्रम करण्याची संधी आहे. विराटला चौथ्या कसोटीत वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. तर कर्णधार म्हणून देखील तो एक खास विक्रम करू शकतो. वाचा- अहमदाबाद येथे होणारी कसोटी ही विराट कोहलीची कर्णधार म्हणून ६०वा सामना असेल. याबाबत तो माजी कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. धोनीने भारतासाठी ६० कसोटीत नेतृत्व केले होते. तर कर्णधार म्हणून १२ हजार धावा करण्यासाठी विराटला फक्त १७ धावांची गरज आहे. चौथ्या कसोटीत त्याने १७ धावा केल्यास अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरेल. याआधी रिकी पॉन्टिंग आणि ग्रॉमी स्मिथ यांनी ही कामगिरी केली आहे. पॉन्टिंगने १५ हजार ४४० तर स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत. वाचा- या शिवाय विराट कोहलीला पॉन्टिंगचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे. या कसोटीत विराटने शतक झळकावल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक करणारा खेळाडू होईल. पॉन्टिगने कर्णधार म्हणून ४१ शतक केली आहेत. विराटच्या नावावर सध्या तितकीच शतक आहेत. वाचा- चौथ्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवल्यास विराट वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार क्लाइव्ह लॉयड यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. चौथी कसोटी जिंकल्यावर तो विराटच्या नेतृत्वाखालील ३६वा विजय असेल. लॉयड यांनी वेस्ट इंडिजला ३६ कसोटी विजय मिळवून दिलाय. वाचा- कसोटीत विराटने कर्णधार म्हणून २० शतक केली आहेत. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या स्मिथच्या नावावर आहे. त्याने कसोटीत २५ शतक केली आहेत. याबाबत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर पॉन्टिंग १९ शतकासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/386juwJ
No comments:
Post a Comment