वेलिंग्टन: ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात त्याने ३१ चेंडूत ७० धावा केल्या. यात ८ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. वाचा- पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंड तिसऱ्या लढतीत टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय काही योग्य ठरला नाही. ऑस्ट्रेलियाने गोलंदाजांची धुलाई केली आणि २० षटकात २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने सर्वाधिक ७०, कर्णधार एरॉन फिंचने ६९ तर जोश फिलिपने ४३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वात स्फोटक फलंदाजी केली ती मॅक्सवेलने, त्याने जेम्स निशमच्या एका ओव्हरमध्ये २८ धावा ठोकल्या. डावातील १७व्या षटकात मॅक्सवेलने ४,६,४,४,४ आणि ६ अशा धावा वसुल केल्या. मॅक्सवेलच्या या स्फोटक खेळीत त्याने मारलेल्या एका षटकाराने स्टेडियममधील खुर्ची तुटली. सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. मॅथ्यू वेड पाच धावांवर बाद झाला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने धमाकेदार फलंदाजी केली. गेल्या काही दिवसांपासून खराभ फॉर्ममध्ये असलेल्या फिंचने ४४ चेंडूत ६९ धावा केल्या. यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा डाव १७.१ षटकात १४४ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाने ६४ धावांनी विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड २-१ने आघाडीवर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3068RWz
No comments:
Post a Comment