
नवी दिल्ली: या वर्षी एप्रिल-मे महिन्या होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या ( ) हंगामासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सहा शहरांची निवड केली आहे. या शहरांच्या निवडीची फटका स्पर्धेतील तीन संघांना बसणार आहे. वाचा- बीसीसीआयने साठी मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या सहा शहरांची निवड केली आहे. मुंबईतील सामने प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. यामुळे राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या शहरांना त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येणार नाही. वाचा- सामन्यांच्या आयोजनासाठी ज्या शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी अहमदाबाद हे एकमेव असे शहर आहे ज्याचा कोणताही संघ नाही. अन्य पाच शहराचे संघ आहेत. जे त्यांच्या घरच्या मैदानावर खेळू शकतली. त्यामुळे यावर्षी स्पर्धा आठ ऐवजी सहा शहरातून होणार आहे. हैदराबाद संघाला देशांतर्गत क्रिकेटमुळे मैदान मिळाले नाही. तर दिल्लीचा समावेश अखेरच्या टप्प्यात करण्यात आला. वाचा- महाराष्ट्रात करोनाची रुग्ण वाढत चालले आहेत. तरी देखील वानखेडेवर सामने भरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिका प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. वाचा- आयपीएलच्या या हंगामाची सुरूवात एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ११ एप्रिलपासून सामन्यांना सुरूवात होऊ शकते. यातील काही राज्यात प्रेक्षकांना स्टेडियमवर जाता येणार नाही. तर काही राज्यात ५० टक्के प्रेक्षक उपस्थित राहू शकतील. वाचा- बीसीसीआयने सहा शहरांची निवड केल्याने राजस्थान, हैदराबाद आणि पंजाब संघांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा झाला असता असे एका संघातील अधिकाऱ्याने सांगितले. जर घरच्या मैदानावर नाही खेळलो तर प्ले ऑफमध्ये पोहोचणे अवघड होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3q5sXug
No comments:
Post a Comment