
नवी दिल्ली : मुंबईचा वेगवान गोलंदाज ज्या म्हटले जायचे तो धडाकेबाज फलंदाजीही करू शकतो, हे आज पाहायला मिळाले. शार्दुल ठाकूरने आज झालेल्या सामन्यात सर्वाधिक षटकार खेचत एक धडाकेबाज खेळी साकारली. शार्दुलच्या या धडाकेबाज खेळीमुळे मुंबईच्या संघाला २०० धावांनी मोठा विजय मिळवता आला. मुंबईचा विजय हजारे ट्रॉफीमध्य आजचा सामना हा हिमाचल प्रदेशबरोबर होता. या सामन्यात शार्दुलने फक्त ५७ चेंडूंमध्ये प्रत्येकी सहा चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर ९२ धावांची धमाकेदार खेळी साकारली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात शार्दुलने सर्वाधिक जास्त षटकार लगावले, त्याचबरोबर शार्दुलपेक्षा जास्त धावाही कोणत्या खेळाडूला करता आल्या नाहीत. शार्दुलच्या या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावांचा डोंगर उभारला होता. या सामन्यात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. मुंबईने आपले तीन फलंदाज फक्त आठ धावांमध्येच गमावले होते. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि आदित्य तरे यांनी मुंबईचा डाव सारवला. सूर्यकुमारने यावेळी ७५ चेंडूंत १५ चौकारांच्या जोरावर ९१ धावांची खेळी साकारली. आदित्य तरेने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ८३ धावा केल्या. पण त्यानंतर शार्दुल खेळपट्टीवर आला आणि त्याने गोलंदजांचा यथेच्छ समाचार घेतला. मैदानामध्ये सर्व बाजूंना फटकेबाजी करत शार्दुलने धावांचा पाऊस पाडला. शार्दुलची ही खेळी मुंबईसाठी नक्कीच सामना जिंकवून देणारी ठरली. आता यापुढच्या सामन्यात सर्वांचे लक्ष नक्कीच शार्दुलच्या कामगिरीवर असेल. मुंबईच्या ३२२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिमाचल प्रदेशच्या संघाला यावेळी चांगली फलंदाजी करता आली नाही. मुंबईने हिमाचलचा डाव यावेळी फक्त १२१ धावांमध्ये आटोपला आणि २०० धावांनी दमदार विजय साकारला. मुंबईकडून यावेळी प्रशांत सोलंकीने सर्वाधिक चार विकेट्स मिळवल्या. प्रशांतला यावेळी शम्स मुलानीने चांगली साथ दिली आणि त्याने तीन फलंदजांना बाद केले. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने यावेळी दोन विकेट्स मिळवल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NNIYbn
No comments:
Post a Comment