अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात () आणि सूर्यकुमार यादव यांना पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात इशान किशनला सलामीवीर म्हणून संधी मिळाली आणि या संधीचे त्याने सोने केले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १६५ धावांचे आव्हानात्मक धावसंख्या दिली होती. केएल राहुल आणि इशान किशन यांनी भारतीय डावाची सुरूवात केली. पहिल्या ओव्हरमध्येच राहुल शून्यावर बाद झाल्याने टीम इंडियाला मोठा झटका बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि विराट कोहली यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागिदारी केली. वाचा- इशानने पदार्पणाच्या सामन्यात ५ चौकार आणि ४ षटकारांसह ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १७५ इतका होता. पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये इशानने अर्धशतक झळकावत एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. पदार्पणाच्या टी-२० मध्ये अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी २०११ साली अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात ६१ धावा केल्या होत्या. या शिवाय इशानने टी-२०च्या पदार्पणात चार षटकार मारले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. विराटने केले कौतुक भारतीय संघाने या सामन्यात ७ विकेटनी विजय मिळवला. सामना झाल्यानंतर विराट कोहलीने इशान किशनचे कौतुक केले. आयपीएलमध्ये इतकी वर्ष खेळताना अनेक आंतरराष्ट्रीय वेगवान गोलंदाजांचा त्याने सामना केला आहे. परिस्थीती संभाळून त्याने फलंदाजी केली. तो बिधास्त फलंदाची करत होता, असे विराट म्हणाला. भारताने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट गमावल्याने मोठा सेटबॅक बसला होता. पण इशानने इंग्लंडच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही. त्याने आक्रमक फलंदाजी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. त्याच्या या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कारने गौरविण्यात आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rJABMG
No comments:
Post a Comment