अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने सात विकेटनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. पाच सामन्यांच्या लढतीतील पहिली लढत भारताने गमावली होती. त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारताने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. या सामन्यात भारताचा कर्णधार याने नाबाद ७३ धावा केल्या. विराटने ४९ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकांसह ही खेळी केली. गेल्या काही दिवसांपासून रन मशिन विराटच्या बॅटमधून धावाच आल्या नव्हत्या. विराटची फलंदाजी ही भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरले असे वाटत असताना त्याने शानदार कमबॅक केले. या खेळीत विराटने काही विक्रम स्वत:च्या नावावर केले. इंग्लंडविरुद्धच्या ७३ धावाच्या खेळीत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून १२ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा कर्णधार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टिंग आणि दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथ यांनी अशी कामगिरी केली आहे. दुसऱ्या टी-२० मध्ये १७ धावा करताच तो या खास यादीत गेला. कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पॉन्टिंगच्या नावावर आहे. त्याने कर्णधार म्हणून १५ हजार ४४० धावा केल्या तर गॅमी स्मिथने १४ हजार ८७८ धावा केल्या आहेत. विराट सध्या स्मिथ आणि पॉन्टिंग यांच्यापेक्षा मागे असला तरी कर्णधार म्हणून सर्वात वेगाने १२ हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. त्याने फक्त २२६ डावात ही कामगिरी केली. यासाठी पॉन्टिंगला २८२ तर स्मिथला २९४ डाव खेळावे लागले होते. टी-२० मध्ये केला विक्रम इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये विराटने केलेला आणखी एक विक्रम म्हणजे टी-२० त्याने ३० हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ३ हजारचा टप्पा पार करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. नरेंद्र मोदी स्टेडिवर झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. त्यांच्याकडून जेसन रॉयने ४६ धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकरू यांनी प्रत्येकी दोन तर चहल आणि भुवनेश्वर यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. भारताकडून विराट कोहीलने नाबाद ७३ तर इशान किशनने ३२ चेंडूत ५६ धावा केल्या. पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ४ षटकार आणि ५ चौकारांसह ५६ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2On4nsl
No comments:
Post a Comment