अहमदाबाद: गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या कामगिरीचे सर्वजण कौतुक करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पराभव, मग इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश. पण या सर्वात एक गोष्ट जी सर्वांना खटकत होती ती म्हणजे कर्णधार ( )चा फॉर्म होय. वाचा- गेल्या काही दिवसात रन मशिन विराट कोहलीला धावा करता आल्या नाहीत. २०२० मध्ये त्याला एकही शतक करता आले नाही. भारताकडून पदार्पण केल्यानंतर असे पहिलेच वर्ष ठरले ज्यात त्याला शतक करता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी विराटने अखेरच्या ४ लढतीत ०,२७,०,० अशा धावा केल्या होत्या. धावांचा हा दुष्काळ विराटने दुसऱ्या टी-२० लढतीत संपवला. विराटने इंग्लंडविरुद्ध ४९ चेंडूत नाबाद ७३ धावा केल्या. यात २ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. गेल्या चार डावात ३ वेळा शून्यावर बाद झालेल्या विराटने त्याच्या खास मित्राशी चर्चा केली आणि तो पुन्हा फॉर्ममध्ये परतला. वाचा- विराटचा हा खास मित्र अन्य कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा () होय. विराटने दुसऱ्या सामन्याआधी एबीशी चर्चा केली. या चर्चेमुळेच तो पुन्हा फॉर्ममध्ये परतला. सामना झाल्यानंतर विराटने सांगितेल की, मी पुन्हा फोकस बेसिक्सवर केला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघातील सहकारी एबीशी चर्चा केली. एबी सोबतच्या चर्चेचा मला फायदा झाला. या चर्चेमुळेच मी चांगली फलंदाजी करू शकलो. एबीने विराटला काय सांगितले मला लक्ष पुन्हा बेसिक्सवर केंद्रीत करावे लागले. कदाचित मी अन्य गोष्टींचा अधिक विचार करत होतो. मला नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करावी याचा गौरव वाटतो. मी चेंडूवर लक्ष केंद्रीत केले. संघ व्यवस्थापनाने देखील काही गोष्टींवर मला सांगितले. अनुष्का देखील येथेच आहे ती ही माझ्याशी बोलतो. खास करून पहिल्या सामन्यानंतर मी एबीशी चर्चा केली आणि त्याने मला फक्त चेंडूकडे पाहण्यास सांगितले आणि मी तसेच केले सोशल मीडियावर किंग कोहली ट्रेडिंगमध्ये... विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध केलेल्या नाबाद ७३ धावांच्या खेळीनंतर सोशल मीडियावर 'किंग कोहली' हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये आला. चाहत्यांनी विराटच्या या खेळीचे भरपूर कौतुक केले आहे. या सामन्यात विराटने टी-२० मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिली फलंदाज ठरला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OAouDf
No comments:
Post a Comment