अहमदाबाद, : तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याला काही वेळातच सुरुवात होणार आहे. पण या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघाला एका फलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण आतापर्यंत या खेळाडूला फलंदाजीच्या क्रमात बढती देण्यात आली आहे. पण त्याला आतापर्यंत मोठी खेळी साकारता आलेली नाही. गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंतला बढली देण्यात आल्याचे पाहायला मिळाले आहे. पहिल्या सामन्यात पंतला श्रेयस अय्यरच्याआधी फलंदाजीला पाठवले होते. त्याचबरोबर दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्याऐवजी पंतलाच चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले होते. पण या दोन्ही सामन्यांमध्ये पंतला आतापर्यंत मोठी खेळी साकारता आलेली नाही. लोकेश राहुल हा दोन्ही सामन्यांमध्ये सपशेल अपयशी ठरला आहे. पण पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इशान किशनने तुफानी फटकेबाजी करत आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक पूर्ण केले होते. या सामन्यात कोहलीनेही नाबाद अर्धशतक झळकावले होते. पण पंतला मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये मोठी खेळी साकारता आलेली नाही. त्यामुळे पंतकडून यावेळी मोठ्या अपेक्षा असतील. सध्याच्या घडीला भारतीय संघात तीन यष्टीरक्षक आहेत. पण विश्वचषकाचा विचार केला तर त्यांच्यापैकी दोघांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे. पंतकडून जर सातत्याने चांगली फलंदाजी होत नसेल तर त्याची जागा लोकेश राहुल किंवा इशान किशन घेऊ शकतात. त्यामुळे जर आता पंतकडून मोठी खेळी पाहायला मिळाली नाही तर त्याचे भारतीय संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पंतसाठी हा तिसरा सामना महत्वाचा असेल. कारण आता भारतीय संघव्यवस्थापन ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्यादृष्टीने विचार करत आहे. त्यामुळे भारताच्या ट्वेन्टी-२० संघात काही प्रयोगही करण्यात येणार आहेत. पण या सर्व प्रयोगांमध्ये जर पंत अपयशी ठरला तर कदाचित त्याचा विचार ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी केला जाणार नाही. त्यामुळे पंतसाठी ही धोक्याची घंटाही ठरी शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vxFx9A
No comments:
Post a Comment