सिडनी: इंग्लंडने चौथ्या कसोटीत भारताचा पराभव जरी केला तरी ऑस्ट्रेलियाचा संघ ( ) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप( )च्या फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतो. टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा दुसरा संघ कोणता यासाठी भारत आणि हे दोन संघ स्पर्धेत आहेत. भारताने इंग्लंडविरुद्धची अखेरची कसोटी ड्रॉ केली तरी ते फायनलमध्ये पोहोचतील. या उलट इंग्लंडने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जाणार होती. ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढणार असून त्यांना याचा फटका बसू शकतो. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीसाठी दोन संघ स्पर्धेत आहेत. पण अचानक आता भारताचे स्थान पक्के होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे आयसीसीकडून होणारी संभाव्य कारवाई होय. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे अर्थात ICCकडे क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ची तक्रार केली आहे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आता आयसीसीने या तक्रारीची दखल घेतली आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका करोना व्हायरसमुळे स्थगित केली. हा दौरा स्थगित केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने आयसीसीकडे तक्रार केली. या तक्रारीत झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई आणि WTCमधील ऑस्ट्रेलियाचे गुण कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, जर आयसीसीने ऑस्ट्रेलियावर गुण कपातीची कारवाई केली तर ते WTCच्या अंतिम फेरीत काही केल्या खेळू शकणार नाहीत. कारण ऑस्ट्रेलियाचे गुण कमी झाल्यास इंग्लंडने भारताचा पराभव केला तरी गुणतक्त्यात ते खालीच राहतील. वाचा- आयसीसीने ऑस्ट्रेलियाला या आठवड्याच्या अखेरपर्यंत उत्तर देण्याची वेळ दिली आहे. या गोष्टीवर चर्चा करून मार्ग काढता येईल का अशी विचारणा ऑस्ट्रेलिया बोर्डाकडे करण्यात आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/384Y6bm
No comments:
Post a Comment