
अहमदाबाद, : भारतामधील कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ आता १-२ अशा पिछाडीवर आहे. त्याचबरोबर फिरकी गोलंदाजीमध्ये इंग्लंडचा संघ लवकर बाद होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला आता मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. कारण इंग्लंडच्या संघाने आता तब्बल तीन प्रशिक्षकांची नियुक्ती केल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने सोमवारी याबाबतची घोषणा केली. फिरकी खेळपट्टीवर इंग्लंडचे फलंदाज जास्त काळ टिकाव धरताना दिसत नाहीत. त्यामुळे आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने फलंदाजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू मार्कस ट्रेस्कॉटीकची निवड केली आहे. त्याचबरोबर आता इंग्लंड क्रिकेट मंडळाने वेगवान गोलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकांचीही यावेळी नेमणूक केली आहे. इंग्लंड क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी न्यूझीलंडला माजी गोलंदाज जतीन पटेलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. पटेलने न्यूझीलंडकडून खेळताना चांगली कामगिरी केली होती. पण आता तो इंग्लंडच्या फिरकीपटूंकडून कशई कामगिरी करून घेतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी आता जॉन लुइस यांची निवड करण्यात आली आहे. मार्कसने इंग्लंडकडून खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजारपेक्षा जास्त धावा बनवल्या आहेत. त्यामुळे मार्कस आता मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून इंग्लंडचा फलंदाजी प्रशिक्षक हे पद सांभाळणार आहे. मार्कस हा समरसेट या क्लबचा सहाय्यक प्रशिक्षक होता, या पदाचा आता त्याने राजीनाम दिला आहे आणि आता काही दिवसांमध्येच तो इंग्लंडच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणार आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा संघ या तिघांच्या मार्गदर्शनाखाली नेमकी कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता नक्कीच क्रिकेट विश्वाला असेल. इंग्लंड क्रिकेट मंडळाचे परफॉर्मन्स डायरेक्टर मो बोबाट यांनी सांगितले की, " इंग्लंडच्या संघाबरोबर एवढे चांगले क्रिकेटपटू जोडल्याचे पाहून मला आनंद झाला आहे. मार्कस, जॉन आणि जीतन यांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बजावली आहे. आता हे तिघे एकत्र येऊन इंग्लंडच्या संघाला अजून मजबूत करतील, असा मला विश्वास आहे."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bMPbwk
No comments:
Post a Comment