अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघ उद्या (गुरुवार) इंग्लंडविरुद्ध चौथी मॅच ( ) खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी उद्याची लढत करो वा मरो अशी असेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या लढतीत भारताला विजय मिळवावाच लागले. वाचा- मालिकेतील तीन पैकी दोन सामन्यात भारतीय संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आता इंग्लंडविरुद्ध भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. आतापर्यंत भारताने नाणेफेक जिंकली तरच सामन्याचा निकाल त्याच्या बाजूने लागतो असे दिसले आहे. वाचा- आतापर्यंत ज्या संघाने टॉस जिंकून धावांचा पाठलाग केला आहे त्यांना विजय मिळवता आला. भारताचा कर्णधार विराट कोहली चांगली कामगिरी करण्यावर भर देत असतो. पण आगामी टी-२० वर्ल्डकपचा विचार करता लक्ष्याचा पाठलाग असो वा प्रथम फलंदाजी दोन्ही वेळा चांगली कामगिरी करून विजय मिळवणे गरजेचे आहे. वाचा- भारतीय संघाचा ज्या दोन लढतीत पराभव झाला. त्या दोन्ही लढतीत संघाला पॉवर प्ले मध्ये धावा करता आल्या नाहीत. ज्याचा परिणाम अंतिम धावसंख्येवर झाला. या दोन्ही लढतीत अनुक्रमे श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांच्या फलंदाजीमुळे भारत धावा करू शकला. केएल राहुलच्या खराब फलंदाजीचा तोटा भारतीय संघाला झाला. पण विराट कोहलीने तोच सलामीचा फलंदाज असेल, असे स्पष्ट केले आहे. वाचा- तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आता टीम इंडियामध्ये चौथ्या सामन्यात आणखी एका ऑल राउडरला स्थान दिले जाऊ शकते. हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या सोबत पदार्पणाची प्रतिक्षा करणारे राहुल तेवतीया किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3trBolS
No comments:
Post a Comment