मुंबई : क्रिकेट मैदानावर अनेकदा असे काही विक्रम होतात जे पाहिल्यानंतर किंवा त्यांच्याबद्दल वाचल्यानंतर सर्वजण हैराण होतात. वादळी फलंदाजी असो की गोलंदाजाकडून होणारी हॅटट्रिक हे सर्व आता क्रिकेट चाहत्यांना परिचयाचे झाले आहे. पण या शिवाय देखील अनेक विक्रम मैदानावर होतात. असाच एक विक्रम मुंबईच्या क्रिकेट संघाने केला आहे. वाचा- बीसीसीआयने महिलांच्या वरिष्ठ खेळाडूंची वनडे ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बुधवारी मुंबईच्या महिला संघाने नागालँडचा फक्त १७ धावांवर ऑल आउट केला. त्यानंतर विजयाचे लक्ष्य फक्त चार चेंडूत एकही विकेट न गमवता पार केले. वाचा- होळकर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईची कर्णधार आणि जलद गोलंदाज सायली सातघरेने पाच धावा देत सात विकेट घेतल्या. नागालँड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण हा निर्णय त्यांच्यासाठी घातक ठरला. १७.४ षटकात त्यांचा १७ धावांवर ऑल आउट केला. नागालँडचे आघाडीचे चार फलंदाज शून्यावर बाद झाले. वाचा- या सामन्यात नागालँडच्या एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणारी सरीबाने सर्वाधिक ९ धावा केल्या. मुंबईकडून सायलीने ७, एस ठाकूर आणि एम दक्षिणी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वाचा- विजयासाठीचे १७ धावांचे आव्हान मुंबईच्या इशा ओझा आणि रुषाली भगत यांनी ३ चौकार आणि एका षटकारासह फक्त चार चेंडूत पार केले. २०१७ साली झालेल्या १९ वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेत नागालँडचा संघ १७ षटकात फक्त दोन धावांत बाद झाला होता. यातील एक धाव वाइडमुळे मिळाली होती. केरळन विजयाचे लक्ष्य पहिल्या चेंडूवर गाठले होते. तर २००६ साली एसीसी ट्रॉफीत नेपाळचा संघ म्यानमार विरुद्ध १० धावांवर बाद झाला होता. तेव्हा म्यानमारने दोन चेंडूत विजय मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38S3ZJo
No comments:
Post a Comment