अहमदाबाद, : भारताला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने आता दुसऱ्या सामन्यासाठी खास रणनिती बनवली आहे. पहिल्या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या सामन्यासाठी संघाची नेमकी काय रणनिती असेल, याबाबत भाष्य केले आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाजांवर जास्तकरून अवलंबून होता आणि त्यांना यामध्ये यशही मिळाले. पण भारतीय संघ पहिल्या सामन्यात तीन फिरकीपटूंवर अवलंबून होता. पण भारताच्या फिरकीपटूंना या सामन्यात चांगले यश मिळाले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात भारताची रणनिती काय असेल, यावर सर्वांचेच लक्ष असेल. दुसऱ्या सामन्यातील रणनितीबाबत श्रेयस म्हणाला की, " भारताची ताकद ही फिरकी गोलंदाजी आहे. त्यामुळेच पहिल्या सामन्यात भारतीय संघ युजवेंद्र चहल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्याबरोबर उतरला होता. ही फिरकीची ताकद आम्ही कायम ठेवणार आहोत. कारण हे फिरकीपटू भारताला विजय मिळवून देऊ शकतात. त्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही आम्ही फिरकी गोलंदाजीवर जास्त जोर देणार आहोत आणि त्यांनाच जास्त पाठिंबा देणार आहोत. कारण त्यांच्या कामगिरीवर भारताचा विजय अवलंबून आहे." श्रेयस पुढे म्हणाला की, " आमच्या फलंदाजीमध्ये कसलीही कमतरता नाही. कारण संघात एकापेक्षा एक मोठे फटके लगावणारे फलंदाज आहेत. सध्याच्या घडीला आम्ही विश्वचषकाचा विचार करत आहोत आणि त्यासाठी पर्याय पाहत आहोत. फलंदाजीच्या क्रमामध्ये थोडी लवचिकता असायला हवी, असे मला वाटते. त्यामुळे परिस्थितीनुसार फलंदाजीच्या क्रमात बदल केले जातात. त्यामुळे कोणत्या फलंदाजाला लवकर पाठवले, तर त्यामध्ये काही वाईट गोष्ट नाही. ही गोष्ट होतच राहणार. पण मी फलंदाजीला जेव्हा उतरलो तेव्हा कोणताही बदल केला नाही. मी परिस्थितीनुसारच खेळत गेलो आणि त्यामध्ये मला यश मिळाले. त्यामुळे कोणत्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशी फलंदाजी करता, हे सर्वात महत्वाचे आहे. त्यामुळे परिस्थितीनुरुप फलंदाजी करणे हे सर्वात महत्वाचे आहे, असे मला वाटते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bFTSJp
No comments:
Post a Comment