अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड ( ) यांच्यातील पहिला टी-२० सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात इंग्लंडने ८ विकेटनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वाचा- या सामन्यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच () आणि ऋषभ पंते अनोखे शॉट, केएल राहुलची फिल्डिंग आणि वॉशिंग्टन सुंदर व जॉनी बेयरस्टो यांच्यात झालेला वाद होय. पण या शिवाय आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. ज्यात भारतीय क्रिकेटपटू चक्क प्रेक्षकांवर रागावल्याचे दिसतेय. वाचा- चांगला इंग्लंडच्या डावात अक्षर पटेल भारताकडून पाचवे षटक टाकत होता. त्याच्या एका चेंडूवर जोश बटलरने षटकार मारला. हा चेंडू थेट प्रेक्षकांच्या गर्दीत पटला. त्यांतर चेंडू घेण्यासाठी स्टेडियममधील प्रेक्षकांच्यात एकच गोंधळ उडाला. चेंडू घेण्यासाठी एकाच वेळी अनेक जण तुटून पडले. वाचा- बराच वेळ झाला तरी चेंडू प्रेक्षकांनी मैदानात पुन्हा टाकला नाही. यावर भारतीय खेळाडू नाराज झाले. भारताचा कर्णधार विराट कोहली प्रेक्षकांकडे पाहत चेंडूची वाट पाहत होता. सीमेरेषेवर उभा असलेल्या हार्दिक पंड्याने प्रेक्षकांना चेंडू लवकर देण्यासाठी इशारा केला. पण प्रेक्षकांनी तो काही न दिल्याने हार्दिक वैतागला. हार्दिकने इशाऱ्याने त्याची नाराजी व्यक्त केली. त्याच्या या नाराजीनंतर प्रेक्षकांनी चेंडू मैदानावर टाकला. त्यानंतर अंपायरने सॅनिटाइज करून खेळ पुन्हा सुरू केला. वाचा- वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दुसरा टी-२० सामना उद्या १४ मार्च रोजी होईल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cqMdOd
No comments:
Post a Comment