अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध झालेला पहिला टी-२० सामना भारताने गमावल्यानंतर सोशल मीडियावर संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे. भारतीय संघाने खराब फलंदाजी केली. त्याच बरोबर संघ निवड देखील चुकल्याची चर्चा सुरू आहे. वाचा- रोहित शर्माला बाहेर बसवण्याचा निर्णयाबरोबरच आणखी एका गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे भारताचा कर्णधार ()च्या कामगिरीची होय. पहिल्या टी-२० मध्ये विराट आदिल रशिदच्या चेंडूवर शून्यावर बाद झाला. वाचा- विराट कोहलीच्या आंतरारष्ट्रीय करिअरमध्ये प्रथमच असे घडले आहे की तो सलग दोन डावात शून्यावर बाद झाला. विराटच्या ४७५ डावात असे प्रथमच घडले आहे. वाचा- ... टी-२० मध्ये इंग्लंडविरुद्ध विराट कोहली कधीच शून्यावर बाद झाला नव्हता. चेन्नईत झालेल्या दुसऱ्या कसोटीत मोइन अलीने विराटला बाद केले होते. याआधी विराट चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाला. वाचा- विराटच्या या खराब कामगिरीवर चाहत्यांनी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटने फार चांगली फलंदाजी केली नव्हती. विराट गेल्या पाच आंतरराष्ट्रीय डावात ३ वेळा शून्यावर बाद झाला आहे. गेल्या पाच डावात तो ०, ६२, २७, ०, ० अशा धावा करू शकलाय. वाचा- पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत फक्त १२४ धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडने विजयाचे लक्ष्य १५.३ षटकात दोन विकेटच्या बदल्यात पार केले आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30CobdL
No comments:
Post a Comment