अहमदाबाद, : नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिलाच सामना फक्त दोन दिवसांत संपला. त्यानंतर या खेळपट्टीवरुन आता जोरदार वाद सुरु आहे. पण ही खेळपट्टी भारताच्या एका क्रिकेटपटूच्या सांगण्यावरुनचच बनवण्यात आली असल्याची गोष्ट आता समोर आली आहे. या स्टेडियमवर आता चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरु होणार आहे. यावेळी वेगवेगळ्या खेळपट्ट्या या मैदानात बनवण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे या मैदानात दोन वेगवेगळ्या मातींचा वापर करुन खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. या मैदाात एकूण ११ खेळपट्या आहेत. या ११ पैकी सहा खेळपट्या या लाल मातीपासून बनवण्यात आल्या आहेत, तर पाच खेळपट्या बनवण्यासाठी काळी माती वापरण्यात आली आहे. तिसऱ्या सामन्यासाठी जी खेळपट्टी बनवण्यात आली होती. ती लाल मातीने बनवलेली होती. ज्यामुळे फिरकीपटूंना या खेळपट्टीवर चांगलीच मदत मिळाल्याचे पाहायला मिळाले. भारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलच्या सांगण्यावरुन या मैदानात ११ खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. पार्थिव जेव्हा २०१७ साली दिलीप ट्रॉफी स्पर्धा खेळण्यासाठी लखनऊला गेला होता तिथे त्याला अश्या वेगवेगळ्या मातीच्या खेळपट्या पाहायला मिळाल्या होत्या. या स्पर्धेनंतर जेव्हा पार्थिव अहमदाबादला पोहोचला तेव्हा मोटेरा स्टेडियमचे काम चालू होते. त्यावेळी पार्थिवने ही गोष्ट गुजरात क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली होती. त्यानंतर गुजरातच्या पदाधिकाऱ्यांनी ही गोष्ट बीसीसीआयच्या पीच आणि ग्राऊंड्स समितीचे प्रमुख गलजीत सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हा विचार सांगितला. त्यानंतर अहमदाबाद येथे अशा खेळपट्या बनवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता इंदुर आणि बडोदा येथेही असेच प्रयोग करण्यात आले आहेत. याबाबत दलजित सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना सांगितले की, " पार्थिव पटेलने जी गोष्ट आम्हाला सांगितली त्यामुळे आम्ही प्रभावित झालो. त्यानंतर आम्ही मोटेरामध्ये वेगवेगळ्या मातींच्या बनवलेल्या खेळपट्या बनवायला सुरुवात केली. या गोष्टीचा फायदा खेळाडूंनाही होतो. कारण भारतामध्ये लाल आणि काळी माती खेळपट्या बनवण्यासाठी वापरण्यात येते. पण एकाच ठिकाणी जर या दोन मातींच्या खेळपट्या असल्या तर खेळाडूंनाही त्याची मदत होते."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kxXqjG
No comments:
Post a Comment