नवी दिल्ली: () यांच्यात झालेल्या तिसऱ्या कसोटीतील पिचवरून अद्याप चर्चा सुरू आहे. सामना दुसऱ्याच दिवशी संपल्याने अनेक जण टीका करत आहेत. पण वेस्ट इंडिजचे महान फलंदाज () यांनी मात्र पिचचे समर्थन केले आहे. त्याच बरोबर इंग्लंडच्या खेळाडूंना रडणे बंद करून फलंदाजी कशी सुधारता येईल याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. वाचा- एका बाजूला पिचवरून अनेक जण टीका करत असताना भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पिचला दोष देण्यास नकार दिला होता. आता असेच मत व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केले आहे. रिचर्ड्स यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ते म्हणतात, भारतात झालेल्या कसोटी सामन्या संदर्भात मला अनेकांनी प्रश्न विचारले. हे प्रश्न दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीबाबत होते. या प्रश्नांवरून मी थोडा गोंधळात आहे. कारण सर्व जण विकेटबद्दल खुप चर्चा करत आहेत. जे पिचबद्दल रडत आहेत ते याचा विचार करत नाहीत की अशा परिस्थितीला कसे तोड द्यायचे. ज्या पिचवर चेंडू स्विंग होतो, गुड लेंथवरून चेंडूला उसळी मिळते, अशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अडचणीची असते असे अनेकांना वाटते. पण तुम्ही दुसरी बाजू पाहिला पाहजे. वाचा- याला कसोटी क्रिकेट असे नाव दिले गेले आहे. कारण यात सर्वत बाबतीत तुमची कसोटी लागते. फिरकीला साथ देणारी खेळपट्टी ही दुसरी बाजू आहे. तुम्ही जेव्हा भारतात खेळता तेव्हा अशा परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी हवी. तुम्ही भारतात जाता तेव्हा फिरकीपटूंच्या भूमीवर जाताय हे लक्षात ठेवले पाहिजे. तुम्हाला हे माहिती हवे की स्वत:ची तयारी करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात. वाचा- खेळपट्टीचा जास्त विचार करण्यापेक्षा याचा विचार करा की मॅच इतक्य लवकर कशी काय संपली. इंग्लंडला गोष्टीचे आकलन करण्याची संधी आहे. पहिल्या कसोटी सामन्यापासून इंग्लंडचा संघ एका सुरक्षित वातावरणात होते आता त्यांनी त्यामधून बाहेर पडले पाहिजे. मला विश्वास आहे की चौथ्या कसोटीसाठी अशाच विकेटवर खेळावे लागणार आहे आणि तसेच होईल. वाचा- मी जर भारतात असतो आणि विकेट तयार करण्याची जबाबदारी माझ्यावर असती तर मी तिसऱ्या कसोटी प्रमाणेच विकेट तयार केली असती, असे रिचर्ड्स म्हणाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3uGQ6XF
No comments:
Post a Comment