अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. तिसरी लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. भारतीय संघात पहिल्या दोन लढतीत नियमीत सलामीवीर रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. पहिल्या लढतीत पराभव झाल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या लढतीत संघात योग्य बदल केले. त्याचा परिणाम भारतीय संघ विजय ठरला. संघातील सध्याचा सलामीवीर केएल राहुल फॉर्ममध्ये नाही. तरी देकील त्याला तिसऱ्या सामन्यात संधी दिली जाईल. दुसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी पदार्पण केले होते. इशानने अर्धशतक झळकावून संघात जागा पक्की केली. सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. भारतीय संघात फक्त एकच कच्चा दुवा दिसतोय तो म्हणजे राहुलची फलंदाजी होय. पंतने विकेटकिपिंग आणि फलंदाजीत चांगली सुधारणा केली आहे. ज्यामुळे तो संघाबाहेर जाणार नाही. जर राहुलला पुन्हा संधी दिली तर रोहित शर्माला या सामन्यात देखील विश्रांती दिली जाऊ शकते. पण तो खेळला नाही तर हिटमॅन पुन्हा मैदानात दिसेल. गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. सामन्याची वेळ भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. नाणेफेक ६.३० वाजता होईल. कुठे होणार तिसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. प्रेक्षकांशिवाय होणार सामना करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढल्याने खबरदारी म्हणून टी-२० मालिकेतील उर्वरीत लढती प्रेक्षकांशिवाय खेळवल्या जातील. LIVE सामना कुठे पाहाल हा सामना तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता ऑनलाइन स्ट्रीमिंग तिसरा टी-२० सामना तुम्ही ऑनलाइन हॉट स्टार आणि एअरटेल अॅपवर पाहू शकता. संभाव्य संघ- भारत: रोहित शर्मा/केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल इंग्लंड: जेसन राय, जोश बटलर, डेव्हिड मलान, जॉनी बेयरस्टो, इयान मॉर्गन, बेन स्टोक्स, सॅम कुरेन, जोफ्रा आर्चर, टॉम कुरेन, ख्रिस जॉर्डन, आदिल राशिद
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cGmq4V
No comments:
Post a Comment