नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने शानदार कामगिरी केली. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर भारताने पुढील ३ सामने जिंकले आणि मालिका ३-१ने जिंकली. भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केली असली तरी एका गोष्टीबाबत भारतीय संघाकडून मोठ्या चूका झाल्या आहेत. वाचा- इंग्लंडविरुद्ध भारताचा फिरकीपटू ( ) ने ३२ विकेट घेतल्या. पण घेण्याबाबत त्याचे निर्णय चुकले. अश्विन आणि कर्णधार विराट कोहली यांनी घेतलेले LBW साठीचे अनेक रिव्ह्यू चुकीचे ठरले. या संदर्भात बोलताना अश्विन म्हणाला, याबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. पण DRS चुकीचे ठरले यासाठी मी एकटा जबाबदार नाही. त्याच्या मते विकेटकिपर ऋषभ पंतने त्याला निराश केले. वाचा- अश्विनच्या मतानुसार पंतला चेंडूचा अँगल आणि उसळी याचा योग्य अंदाज घेता आला नाही. त्यामुळेच मला त्याच्याकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्या पद्धतीने लोक मला डीआरएस बाबत पाहत आहेत त्यात बदल करण्याची गरज आहे. इंग्लंडविरुद्ध या मालिकेआधी DRS बाबतचे माझे अंदाज बऱ्यापैकी बरोबर ठरले होते. वाचा- मी योग्य प्रश्न विचारतोय असे म्हणत अश्विन म्हणाला, चेंडू कोणत्या लाइनवरून हिट झाली अथवा नाही याची मला कल्पना असते. पण तो किती उसळी घेतोय आदी बाबत मला विकेटकिपरची मदत गरजेची असते. जर एखाद्या गोष्टीत सुधारणा करण्याची गरज असेल तर मी त्यासाठी नक्की प्रयत्न करेन. भविष्यात डीआरएस घेण्याबाबत मी अधिक काळजी घेइन, असे अश्विन म्हणाला. वाचा- अश्विन LBW साठी अनेक वेळा अपील करतो. या मालिकेत देखील अनेक वेळा असे झाले की डीआरएस बाबतचे निर्णय त्याच्या बाजूने लागले नाही. पण तो कोहलीला राजी करतो आणि नंतर मात्र मैदानावरील अंपायरचा निर्णय योग्य ठरतो. इंग्लंडविरुद्धच्या चार सामन्यातील ८ डावात अश्विनने ३२ विकेट घेतल्या. त्याची सरासरी १४.७२ इतकी होती. मालिकेत त्याने तीन वेळा डावात पाच विकेट घेतल्या. गोलंदाजी सोबत फलंदाजीत देखील त्याने कमाल केली होती. अश्विनने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3eKwhJh
No comments:
Post a Comment