मुंबई: भारतीय संघातील जलद गोलंदाज (Jasprit Bumrah) लवकरच लग्न करणार आहे. भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. पण जसप्रीत कोणाशी लग्न करणार आहे याबाबत सस्पेंस अद्याप संपलेला नाही. प्रथम असे वृत्त आले होते की तो दक्षिण चित्रपटात काम करणारी अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन हिच्याशी लग्न करणार आहे. पण आता तो मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर () हिच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. इतक नव्हे तर या दोघांचा विवाह गोव्यात होणार आहे. बुमराह आणि गणेशन यांना कधीच एकत्र मीडियाने पहिले नाही. या दोघांच्या लग्नाचे वृत्त खरे ठरले तर मीडियापासून त्यांनी ही गोष्टी इतके दिवस यशस्वपणे लवून ठेवली असेच म्हणावे लागले. वाचा- मीडिया रिपोर्ट्सनुसार बुमराह आणि संजना १४ किंवा १५ मार्च रोजी गोव्यात विवाह करतील. बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर टी-२० आणि वनडे मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहने चौथ्या कसोटीतून माघार घेतल्यापासून त्याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. संजना एक स्पोर्ट्स अँकर आहे. या दोघांना कधीच सार्वजनिक आयुष्यात एकत्र पहिले गेले नाही. बीसीसीआयच्या एका पुरस्कार सोहळ्यात संजनाने बुमराहची मुलाखत घेतली होती. आता तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुमराहच्या या विवाहात भारतीय संघातील खेळाडूंना उपस्थित राहता येणार नाही. कारण टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळत असेल आणि त्यांना बायो बबलमधून बाहेर येता येणार नाही. वाचा- पुण्याची संजना गणेशन ज्या मीडिया रिपोट्समध्ये बुमराह हा संजना गणेशन सोबत लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर संजना बद्दल चाहत्यांनी सर्च करण्यास सुरूवात केली. संजना मॉडेल आणि क्रीडा अँकर आहे. तिने क्रिकेट, बॅडमिंटन आणि फुटबॉलसह अनेक इव्हेंट्स होस्ट केले आहेत. २०१९ साली झालेला वनडे वर्ल्डकप तिने भाारताकडून होस्ट केला होता. वाचा- संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला होता. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. इतकच नव्हे तर संजनाने आयपीएल लिलावाचे होस्ट म्हणून काम केले. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Oj2bBT
No comments:
Post a Comment