अहमदाबाद: पहिल्या टी-२० लढतीत इंग्लंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत भारताने फक्त १२४ धावा केल्या. इंग्लंडने विजयाचे लक्ष्य १५व्या ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमवून पार केले. या विजयासह पाहूण्या संघाने पाच सामन्याच्या मालिकेत १-० असी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना उद्या १४ मार्च रोजी होणार आहे. वाचा- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी भारताकडून ज्या फलंदाजांनी डाव सावरला त्यापैकी हार्दिक पंड्याच्या एका शॉटची चर्चा सामान्य क्रिकेट चाहत्यापासून ते आयसीसी आणि माजी क्रिकेटपटू करत आहेत. भारताच्या डावात हार्दिकने बेन स्टोक्सला एक अफलातून शॉट मारला जो पाहून चाहते हैराण झाले. आयसीसीने देखील या शॉटचा फोटो शेअर करत त्याला नाव देण्यास सांगितले आहे. सोशल मीडियावर देखील या शॉटसाठी हार्दिकचे कौतुक केले जात आहे. भारतीय डावातील १५व्या षटकात बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौथ्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारला. त्यानंतरचा चेंडू स्टोक्सने बाउसर टाकला. ज्यावर हार्दिकने हा शॉट खेळला. ज्यावर भारताला चौकार मिळाला. वाचा- हार्दिकचा अफलातून शॉट पाहून नॉन स्ट्रायकर बाजूला उभा असलेला श्रेयस अय्यर देखील हैराण झाला. त्याने २१ चेंडूत १९ धावा केल्या. यात १ चौकार आणि एक षटकार मारला. भारतीय डावात श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qNc1cl
No comments:
Post a Comment