अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत भारताची कामगिरी निराशजनक झाली. इंग्लंडने भारताचा ८ विकेटनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या लढतीत भारताने प्रथम फलंदाजी करत फक्त १२४ धावा केल्या. उत्तरादाखल इंग्लडने १५.३ षटकात २ विकेटच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य पार केले. वाचा- पहिल्या लढतीत भारताचा कर्णधार ( ) शून्यावर बाद झाला. पाच चेंडू खेळल्यानंतर आदिल रशीदच्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनने त्याचा कॅच घेतला. आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये सलग दोन डावात शून्यावर बाद होण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. वाचा- ... विराटच्या या बाद होण्यावर उत्तराखंड पोलिसांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पोलिसांच्या अधिकृत खात्यावरून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये विराट बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये जात असल्याचे दिसते. या फोटोसोबत ते म्हणतात, फक्त हेल्मेट वापरणे पुरेसे नाही. तर गाडी जबाबदारीने चालवली पाहिजे. नाही तर कोहली प्रमाणे तुम्ही देखील शून्यावर बाद होऊ शकता. याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानच्या विरुद्ध नो बॉल टाकल्यानंतर जसप्रीत बुमराहचा फोटो ट्विट करण्यात आला होता. तेव्हा लोकांना सिग्नलवरील लाइन क्रॉस न करण्याबद्दल सांगण्यात आले होते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ldqFIW
No comments:
Post a Comment