कराची: पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग () ही स्पर्धा बायो-बबल ( ) अर्थात जैव सुरक्षित वातावरणात सुरू आहे. पण या स्पर्धेतील एका खेळाडूला करोनाची लागण झाली. त्यामुळे स्पर्धेतील बायो-बबल प्रोटोकॉल नीट ठेवण्यात अपयशी ठरल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर () केली जात आहे. वाचा- ऑस्ट्रेलियाचा खेळाडू फवाद अहमद याला कोरनाची लागण झाली आहे. त्याच रिपोर्ट सोमवारी आला. यामुळे स्पर्धेतील एक मॅच स्थगित करण्यात आली. स्थानिय मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार यासाठी जबाबदार आहे. वाचा- पीसीबीने दिलेल्या माहितीनुसार स्पर्धेचा कालावधी नियोजित वेळेनुसार २२ मार्चपर्यंत पूर्ण होईल. पण पाक मीडियाने संघातील खेळाडू, अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचा बोर्डाचा दावा खोटा ठरला असे म्हटले आहे. क्वारंटाइन कालावधि पूर्ण करण्याच्या आधीच काही खेळाडूंच्या कुटुंबियांना जैव सुरक्षित वातावरणात जाण्याची परवानगी दिल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. वाचा- पाकिस्तान सुपर लीग या स्पर्धे शिवाय इतर कार्यक्रम देखील होत आहेत. अनेक खेळाडू बाहेरून जेवण मागवत आहेत, असे वृत्त समोर येत आहे. खेळाडू संघा सोबत बायो बबलमध्ये आहेत. पण ते जेव्हा मैदानावर येतात तेव्हा मैदानावरील कर्मचारी जे बायो बबलचा भाग नाहीत त्यांच्या संपर्कात येतात. करोना प्रोटोकॉल तोडल्याने जलद गोलंदाज वहाब रियाज आणि वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी यांना सामना खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे देखील पीसीबीवर टीका झाली होती. वाचा- या प्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्ड सर्वोत्तम करत आहे. आम्ही सर्व संघांसाठ कडक तयार केले आहे आणि खेळाडूंची नियमीतपणे पीसीआर टेस्ट केली जाते. फवादची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. पण तो कसा काय करोना पॉझिटिव्ह झाला यांची आम्हाला कल्पना नाही. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/384unzj
No comments:
Post a Comment