अहमदाबाद: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक () यांनी सोमवारी करोना व्हायरस लशीचा ( ) पहिला डोस घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करून ही माहिती दिली. वाचा- शास्त्री सध्या अहमदाबाद येथे भारतीय संघासोबत आहेत. तेथे रुग्णालयात जाऊन त्यांनी लस घेतली. शास्त्री यांनी करोना व्हायरसपासून बचावासाठी पहिली लस घेतली. वाचा- सोशल मीडियावर फोटो पोस्ट करताना त्यांनी म्हटले आहे की, कोव्हिड १९च्या लशीचा पहिला डोस घेतला आहे. या व्हायरसच्या विरुद्ध भारताला सशक्त तयार करण्यासाठी डॉक्टर आणि वैज्ञानिकांना धन्यवाद. अहमदाबादच्या अपोलो रुग्णालयातील कांताबेन आणि त्यांच्या पथकाचे शास्त्री यांनी आभार मानले. वाचा- वाचा- भारतीय संघ सध्या इंग्लंडसोबत कसोटी मालिका खेळत आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ने आघाडीवर आहे. मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना चार मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानावर तिसऱ्या कसोटी सामना झाला होता. ज्याचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला होता. भारताने तिसरा सामना १० विकेटनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kAtsLQ
No comments:
Post a Comment