
नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला. त्यानंतर अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पिचवरून वाद विवाद सुरू झालाय. अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर मत व्यक्त केली आहेत. एका बाजूला टीका करणारे माजी खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनिल गावस्कर आणि वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज व्हिव्हियन रिचड्स यांनी या पिचचे समर्थन केले. या चर्चेत पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने उडी घेतली आहे. वाचा- पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने युट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओत यावर मत व्यक्त केले. तो म्हणतो, भारतीय संघ घाबरला होता. त्याचा परिणाम म्हणून तिसऱ्या कसोटीसाठी इतकी खराब पिच तयार केली. कसोटी सामन्यासाठी अशा प्रकारची विकेट असली पाहिजे का, निश्चितपणे नाही. एक अशी खेळपट्टी जेथे विनाकारण चेंडू वळत होता आणि सामना दोन दिवसात संपला. ही गोष्ट कसोटी क्रिकेटसाठी चांगली नाही. वाचा- घरच्या मैदानाचा फायदा घेण्याची गोष्टी मी समजू शकतो. पण अशा पद्धतीने फायदा घेणे जरा अती होते. जर भारताने या सामन्यात ४०० धावा केल्या असत्या तर इंग्लंड २००वर बाद झाला असता. पाहुणा संघ खराब खेळला. पण भारतीय संघ देखी १४५ धावांवर बाद झाला. जर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करू शकत असेल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही आणि तिसऱ्या कसोटी प्रमाणे पिच करण्याची देखील गरज लागणार नाही, असे अख्तर म्हणाला. वाचा- भारतीय संघ मजबूत आहे आणि चांगली खेळपट्टी तयार करून कोणाला झुकतीबाजू न देता खेळण्याची गरज आहे. टीम इंडिया इतकी जबरदस्त आहे की ते इंग्लंडचा पराभव करू शकतील. मला वाटते की भारताने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाचा- दोन्ही देशातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना चार मार्चपासून अहमदाबाद येथेच होणार आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3bTDy6x
No comments:
Post a Comment