
नवी दिल्ली: क्रिकेट मध्ये गेल्या काही वर्षात एकापेक्षा एक अफलातून घेतलेले पाहायला मिळाले आहेत. फक्त आंतरराष्ट्रीय वनडे किंवा टी-२० मध्ये नाही तर आयपीएल आणि बिग बॅश सारख्या टी-२० लीग स्पर्धेत असे कॅच पाहायला मिळतात. अशाच एका कॅचचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा- क्रिकेटमधील अनेक शानदार खेळी किंवा कॅच हे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही तर स्थानिक क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेतील एका स्थानिक स्पर्धेतील अशाच एका अफलातून कॅचचा व्हिडिओ चर्चेत आला आहे. हा कॅच पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की चौकार जाणारा चेंडू कसा काय पकडला. वाचा- स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डरने शॉर्ट फाइन लेगला जाऊन कॅच घेतला. जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकला तेव्हा फलंदाजाने पॅडल स्विप मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्लिपमध्ये उभ्या असलेल्या फिल्डने शॉर्ट लेगला पळत जाऊन कॅच घेतला. वाचा- फलंदाजाने शॉर्ट मारल्यावर चेंडू हवेत जातो विकेटकिपरच्या बाजूने गेलेला हा चेंडू कोणालाही चौकारच वाटले. पण त्याच वेळी स्लिपमधील फिल्डर वेगाने हवेत उडी मारून कॅच पकडतो. त्याचा हा कॅच पाहिल्यानंतर फलंदाज आणि अंपायर दोघांनाही विश्वास बसत नाही. वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघात अनेक दर्जेदार फिल्डर झाले आहेत. जॉन्टी रोड्स त्यापैकी एक नाव होय. त्याने १९९२च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या इंझमाम उल हकला ज्या पद्धतीने धावबाद केले होते. ते वर्ल्ड क्रिकेटमधील सर्वोत्तम रन आउट मानले जाते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MGHEXm
No comments:
Post a Comment