
नवी दिल्ली: २०२१च्या लिलावासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलला पुन्हा एकादा मोठी बोली लावण्यात आली. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये खराब कामगिरी केल्याने त्याला पंजाब किंग्ज संघाने रिलीझ केले होते. पण यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने १४.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. वाचा- लिलावानंतर मॅक्सवेलने आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करू असे म्हटले होते. मॅक्सवेलने डिप्रेशनमुळे क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. त्या काळात भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याचे समर्थन केले होते. वाचा- विराटने डिप्रेशनच्या काळात माझी मदत केली होती. त्याने माझ्या निर्णयाचे समर्थन केले होते. ज्या गोष्टींचा माझ्यावर दबाव होता, त्या सर्व विराटला समजल्या होत्या. मला वाटते की तो देखील या सर्वातून गेला असेल. मॅक्सवेलने मानिसक आरोग्य ठिक नसल्याने काही महिने क्रिकेटपासून ब्रेक घेतला होता. त्या काळात मी हाच विचार करायचो की क्रिकेटमध्ये परत कसे येऊ. डिप्रेशनमधून बाहेर आल्यानंतर मॅक्सवेलने मैदानावर शानदार कामगिरी केली. २०१९-२० मध्ये त्याने मेलबर्न स्टार्सकडून कमबॅक केले. त्यानंतर तो राष्ट्रीय संघात आला आणि सातत्याने चांगली कामगिरी करून दाखवतोय. वाचा- आगामी आयपीएलमध्ये सोबत खेळण्यास उत्सुक आहे. फक्त मॅच नाही तर सरावाची त्याची पद्धत समजून घेण्यास उत्सुक आहे. त्याच्याकडून नेतृत्वगुण शिकून घेण्यास उत्सुक असल्याचे मॅक्सवेल म्हणाला. विराट कसोटी ते टी-२० पर्यंत सर्व प्रकारात चांगली कामगिरी करतोय. परिस्थितीनुसार तो त्याचा खेळ बदलतो. मोठ्या काळावधीपासून त्याने दबदबा कायम ठेवला आहे. विराटने काही दिवसांपूर्वी २०१४च्या इंग्लंड दौऱ्या डिप्रेशनमध्ये गेल्याचे सांगितले होते. तेव्हा भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याची मदत केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sAbax6
No comments:
Post a Comment