अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ आता पाच सामन्यांची खेळणार आहे. कसोटी मालिका ३-१ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण आता टी-२० मालिकेच्या आधी भारतीय संघासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. टी-२० मालिकेसाठी अंतिम ११ मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची असा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात टी-२० वर्ल्डकप होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. अंतिम संघ निवडण्याचे आव्हान व्यवस्थापनासमोर आहे. कारण ११ जागासाठी १९ खेळाडू उपलब्ध आहेत. यातील काही स्थानासाठी दोन दोन खेळाडूंची दावेदारी आहे. वाचा- शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कशी होते, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्यावर ठरणार आहे. प्रथम मालिका विजय मिळून मग प्रयोग करण्याचा विचार होऊ शकतो. अशा परिस्थितीत मालिका विजयानंतर कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना नंतर संधी दिला जाऊ शकते. वाचा- भारतीय संघासाठी मालिकेचा निकाल देखील महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या तीन लढतीसाठी एकच संघ असू शकतो. संघात ऋषभ पंतला स्थान मिळण्याची शक्यता आहे. पंतचा समावेश म्हणजे लोकेश राहुलला संधी मिळणार नाही. सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि रोहित शर्मा हीच जोडी कायम असेल. काही महिन्यांपूर्वी राहुलकडे सलामीचा फलंदाच आणि विकेटकिपर म्हणून पाहिले जात होते. पण आता या दोन्ही जागांसाठी स्पर्धा वाढली आहे. वाचा- धवनने विजय हजारे ट्रॉफीत १५०च्या जवळ धावा केल्या होत्या. तर रोहित बाबत चर्चा करण्याची गरज नाही. राहुलला संघात सलामीवीर म्हणून संधी दिली तर शिखरला मधळ्या फळीत खेळवावे लागले. राहुल आयपीएलमधील आघाडीचा फलंदाज आहे. अशा परिस्थितीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर त्यानंतर पंत पाचव्या आणि मग हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतात. अशा स्थितीत फक्त चौथ्या क्रमांकाची जागी शिल्लक आहे. या जागेसाठी श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या स्पर्धा आहे. वाचा- गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार मोठ्या कालावधीनंतर संघात परत येतोय. त्याची स्पर्धा दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर यांच्याशी असेल. अनुभव आणि डेथ ओव्हरमधील उत्तम गोलंदाजीच्या जोरावर कुमार पुढे असेल. पण त्याने मुश्ताक अली टी-२० वगळता फार क्रिकेट खेळले नाही. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल ही जोडी संघात दिसू शकते. त्याच बरोबर टी नटराजन आणि नवदीप सैनी यांना संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. संघात सर्वोत्तम खेळाडू आहेत आणि या सर्वांना खेळवण्याचे आव्हान संघ व्यवस्थापनापुढे असेल. इंग्लंडविरुद्ध १२ मार्च रोजी पहिली टी-२० लढत होणार आहे. ही संपूर्ण मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kXX8CU
No comments:
Post a Comment