नवी दिल्ली: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल ( final ) १८ ते २२ जून या काळात होणार आहे. ही फायनल भारत आणि न्यूझीलंड ( ) यांच्यात होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ही लढत लॉर्ड्सवर होणार होती. पण आता त्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. वाचा- जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत आता साउथम्प्टन येथील रोज बाउल येथे होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. करोना व्हायरसची परिस्थिती लक्षात घेऊन नव्या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. हे मैदाना हॉटेलच्या जवळ असल्याने त्याची निवड करण्यात आली आहे. वाचा- भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३-१ने विजय मिळवला. भारताने अंतिम कसोटीत एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचे तिकिट मिळवले. वाचा- असे... भारतीय संघातील फिरकीटपटू आर अश्विनच्या मते ही अंतिम लढत ३ सामन्यांची झाली असती तर त्याचे महत्त्व आणखी वाढले असते. ही फायनल मॅच खेळणे हे वर्ल्ड कप फायनल खेळण्यासारखे आहे. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत अश्विनने शानदार कामगिरी केली होती. त्याने मालिकेत ३२ विकेट घेतल्या, यासाठी त्याचा मालिकावीर म्हणून गौरव करण्यात आला. तर अक्षर पटेलने देखील पदार्पणाच्या कसोटीत २७ विकेट घेतल्या. वाचा- संधी अखेरच्या कसोटीत ऋषभ पंतने शतक झळकावले होते. त्याने केलेल्या १०१ धावांमुळे भारताला आघाडी घेता आली. पंतला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MX5fmB
No comments:
Post a Comment