अहमदाबाद: मुंबईचा क्रिकेटपटू ( )चा मोठ्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघात निवडण्यात आले. आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या लढतीत सूर्यकुमारची अंतिम ११ जणांमध्ये निवड होण्याची शक्यता आहे. वाचा- देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारला ३०व्या वर्षी भारतीय संघात संधी मिळाली. आज इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात त्याची निवड झाल्यास सूर्यकुमारचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. वाचा- ... भारतीय संघा कसा असेल याबाबत कर्णधार विराट कोहलीने अद्याप काही सांगितले नाही. पण मुंबईच्या क्रिकेटपटूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सूर्यकुमार भारतीय संघाच्या जर्सीमध्ये दिसतोय. सूर्यने त्याच्या ट्विटरचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. सूर्यकुमारच्या या फोटोवरून तो आज अंतिम ११ मध्ये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाचा- सूर्यकुमारने इस्टाग्राम स्टोरीवर बॉलिवूड अभिनेता आणि फिटनेस आयकॉन साहिल खानची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये साहिलने सूर्यकुमार आज आंतरराष्ट्रीयस्तरावर पदार्पण करणार असल्याचे म्हटले आहे. वाचा- आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमारने ७७ प्रथम श्रेणी सामन्यात १४ शतक आणि २६ अर्धशतक केली आहेत. त्याच्या नावावर ५ हजार ३२६ धावा आहेत. तर ७० टी-२० सामन्यात १९ अर्धशतकांसह ३ हजार ५६७ धावा त्याने केल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t7rWUs
No comments:
Post a Comment