लंडन: जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय टी-२० लीग म्हणून इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेकडे पाहिजे जाते. स्पर्धेबाबत अनेकदा टीका केली जाते. या स्पर्धेत फक्त पैसा पाहिला जातो वैगरे टीका होत असते. आयपीएलचा १४वा हंगाम देखील जवळ आला आहे. अशात या स्पर्धेबद्दल महत्त्वाचे विधान एका देशाच्या क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापकीय संचालकाने केले आहे. वाचा- इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट () बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक एशले जाइल्स यांच्या मते, आयपीएल स्पर्धा आमच्यासाठी फायद्याची ठरली. या स्पर्धेमुळे इंग्लंडचे क्रिकेटपटू राष्ट्रीय संघाला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी पोहचवू शकले. याच आठवड्यात इंग्लंडा स्टार खेळाडू जोस बटलर म्हणाला होता की, ECBने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी कधीच आयपीएलमधून माघार घेण्यास सांगितले नाही. वाचा- खेळाडूंच्या चर्चेत मी त्यांना स्वत:च्या कार्यक्रमावर लक्ष देण्यास सांगितले. त्यांना कोणते आदेश दिले नाहीत, असे जाइल्स म्हणाले. आम्ही कोणत्याही पद्धतीचा दबाव टाकत नाही. आयपीएलकडे दुर्लक्ष केले जात नाही. माझ्या मते या स्पर्धेचा आम्हाला खुप फायदा झाला. आमच्या संघातील १२ ते १६ खेळडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. वाचा- काही वर्षांपूर्वी आमच्या खेळाडूंसाठी आयपीएलचा अनुभव घेणे अवघड होते. आता आमच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये मोठी मागणी आहे. कदाचीत यामुळेच क्रिकेटच्या दोन्ही प्रकारात नंबर एकला आहोत. वाचा- ... इंग्लंडचे १२ खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यापैकी काहींचा करार कोटींमध्ये आहे. यात बटलर, स्टोक्स, आर्चर, मोइन अली, सॅम करन, टॉम कुरेन, डेव्हिड मलान यांचा समावेश आहे. वाचा- आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या काळात होणार आहे. जर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका दोन जूनपासून सुरू होईल. आम्ही खेळाडूंना आयपीएलमध्ये पाठवण्यास तयार आहोत. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर तयार केला होता. तो मुख्य कार्यक्रमाचा भाग नव्हता. वाचा- इंग्लंडचे खेळाडू आयपीएच्या सुरुवातीपासून उपलब्ध असतील. जर खेळाडूंचे संघ स्पर्धेच्या अखेरपर्यंत पोहोचले तर ते देखील संबंधीत संघासोबत असतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2NawdY2
No comments:
Post a Comment