
नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून चौथी कसोटी सुरू होणार आहे. चार सामन्यांच्या कसोटीत भारत २-१ने पुढे आहे. भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची सुवर्ण संधी आहे. चौथी कसोटी ड्रॉ झाली तरी भारत फायनलमध्ये पोहोचू शकतो. या बरोबर भारत घरच्या मैदानावर सलग १३वी जिंकण्याचा विक्रम करेल. वाचा- भारतीय संघाने घरच्या मैदानावर २०१२ साली इंग्लंडकडून अखेरचा पराभव स्विकारला होता. त्यानंतर भारताने एकाही कसोटी मालिकेत पराभव स्विकारला नाही. २०१९ साली बांगलादेशचा २-०ने पराभव करत भारताने १२वा मालिका विजय मिळवला होता. भारताने इंदूर कसोटीत बांगलादेशचा १३० धावांनी आणि त्यानंतर कोलकाता कसोटीत एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला होता. घरच्या मैदानावर सलग कसोटी मालिका विजय मिळवणारा भारतीय संघ असून त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. त्यांनी दोन वेळा सलग १०-१० कसोटी मालिका जिंकल्या आहेत. वाचा- भारत- फेब्रुवारी २०१३ ते आतापर्यंत सलग १२ मालिका विजय ऑस्टेलिया- नोव्हेंबर १९९४ ते नोव्हेंबर २००० सलग १० मालिका विजय ऑस्ट्रेलिया- जुलै २००४ ते नोव्हेंबर २००८ सलग १० मालिका विजय वेस्ट इंडिज- मार्च १९७६ ते फेब्रुवारी १९९६ सलग ८ मालिका विजय भारताने २०१२च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर ३७ कसोटी सामने खेळले आहेत. यातील ३० कसोटी विजय तर २ मध्ये पराभव झालाय. ५ कसोटी सामने ड्रॉ झाले आहेत. ऑस्ट्रेलियाने विजय मिळवलेल्या सलग १० कसोटी मालितील २७ पैकी २० सामने जिंकले होते. तर दोनमध्ये पराभव झाला होता. वाचा- भारताचा विजयाचा प्रवास १) फेब्रुवारी २०१३- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-०ने विजय २) नोव्हेंबर २०१३- वेस्ट इंडिजविरुद्ध २-०ने विजय ३) नोव्हेंबर २०१५- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-०ने विजय ४) सप्टेंबर २०१६- न्यूझीलंडविरुद्ध ३-०ने विजय ५) नोव्हेंबर २००६- इंग्लंडविरुद्ध ४-०ने विजय ६) फेब्रुवारी २००७- बांगलादेशविरुद्ध १-०ने विजय ७) फेब्रुवारी २०१७- ऑस्ट्रेलिया विरुद्ध २-१ने विजय ८) नोव्हेंबर २०१७- श्रीलंकेविरुद्ध १-०ने विजय ९) जून २०१८- अफगाणिस्तानविरुद्ध १-०ने विजय १०) ऑक्टोबर २०१८- २-०ने विजय ११) ऑक्टोबर २०१९- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३-०ने विजय १२) नोव्हेंबर २०१९- बांगलादेशविरुद्ध २-०ने विजय
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sGE8LP
No comments:
Post a Comment