अहमदाबाद: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० भारतीय फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल( )ला फलंदाजीत कमाल करता आली नाही. तो फक्त १ धाव करून बाद झाला. पण फिल्डिंगमध्ये त्याने अशी काही कामगिरी केली ज्याचे कौतुक सर्वजण करत आहेत. वाचा- इंग्लंडच्या डावात पाचव्या षटकात अक्षर पटेलने टाकलेल्या चेंडूवर जोश बटलरने लॉग ऑफच्या दिशेने चेंडू हवेत मारला. बटलरने मारलेला चेंडू सीमापार जाणार यात कोणालाही शंका नव्हती. पण तेथे उभ्या असलेल्या केएल राहुलला ते मंजूर नव्हते. वाचा- राहुलने हवेत सुपर मॅन प्रमाणे उडी मारून कॅच घेतला. पण सीमारेषेच्या आता जाणार याची जाणीव झाल्याने राहुलने चेंडू आत टाकला. ज्या चेंडूवर ६ धावा मिळणार होत्या त्यावर फक्त इंग्लंडला दोन धावा घेता आल्या. वाचा- वाचा- केएल राहुलची ही फिल्डिंगपाहून क्रिकेट चाहते, समालोचक आणि खुद्द फलंदाज जोश बटलर देखील हैराण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुलच्या या शानदार फिल्डिंगवर भारताच्या सर्व खेळाडूंनी त्याचे कौतुक केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tgnjaK
No comments:
Post a Comment