अहमदाबाद: 1st t20i भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. प्रथम अचूक गोलंदाजी करत भारताला १२४ धावा रोखले आणि नंतर १५व्या षटकात ८ विकेटने विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. वाचा- काही दिवसांपूर्वी भारताने कसोटी मालिकेत इंग्लंडचा दारूण पराभव केला होता. त्यामुळे पहिल्या टी-२०तील विजयाने इंग्लंडच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला. पण भारताच्या पराभवाने अतिउत्साहीत झालेला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने ट्वीट केले ज्यात भारतीय संघाची तुलना आयपीएलमधील संघाशी केली. भारतीय संघाच्या पराभवानंतर इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने ट्विट केले आणि म्हटले की, ()चा संघ भारतीय संघापेक्षा अनेक पटीने चांगला आहे. #JustSaying #INDvENG वाचा- या ट्विटला त्याने मुंबई इंडियन्स आणि बीसीसीआयला टॅग केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ७ बाद १२४ धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने ६७ धावा, ऋषभ पंतने २१ तर हार्दिक पंड्याने १९ धावा केल्या. भारताची आघाडीची फळी पूर्णपणे अपयशी ठरली. वाचा- व्हिडिओ इंग्लंडने जेसन रॉय, जोस बटलर यांच्या दमदार सलामी आणि नंतर डेव्हिड मलान आणि जॉनी बेयरस्टोच्या जोरावर विजयाचे लक्ष्य १५.३ षटकात दोन विकेटच्या बदल्यात पार केले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cGTSZ5
No comments:
Post a Comment