अहमदाबाद: भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ने पराभव झाल्यानंतर इंग्लंडने पहिल्या टी-२० ( ) लढतीत शानदार विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी आणि माजी खेळाडूंनी आनंद झाला. पण यातील एका माजी खेळाडूने अतिउत्साहात भारतीय संघाची तुलना आयपीएलमधील संघाशी केली. यावर भारताच्या माजी खेळाडूने सोशल मीडियावर असे झणझणीत उत्तर दिले की, इंग्लंडच्या खेळाडूची बोलती बंद झाली. वाचा- पहिल्या टी-२० मध्ये भारतीय संघाची खराब कामगिरी झाली. १२४ धावा करणाऱ्या भारतीय संघाला आठ विकेटनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार ()ने भारतीय क्रिकेट संघाची तुलना आयपीएलमधील या संघाशी केली. सोशल मीडियावर त्याने मुंबई इंडियन्सचा संघ भारतीय संगापेक्षा किती तरी पटीने चांगला आहे, असे म्हटले. मायकल वॉनने या ट्वीटमध्ये मुंबई इंडियन्स आणि बीसीसीआयला टॅग केले. वाचा- वाचा- आता भारतीय संघावर अशी पद्धतीने टीक करणाऱ्या वॉनला कोणी उत्तर दिले नसते तर नवलच झाले असते. गेल्या काही महिन्यात ट्विटवर भन्नाट प्रतिक्रिया देऊन चर्चेत येणारा भारताचा माजी क्रिकेटपटू वासीम जाफर( )ने वॉनले असे काही उत्तर दिले की त्याची बोलती बंद झाली. मयाकल वॉनला उत्तर देताना जाफर म्हणाला, सर्व संघ इतक्या नशिबवान नसतात की त्यांना चार विदेशी खेळाडू खेळवता येतील मायकल. वाचा- जाफरच्या उत्तरामध्ये मायकल वॉनला याची जाणीवर करुन दिली आहे की, इंग्लंडच्या संघातील चार खेळाडू असे आहेत जे मुळ इंग्लंड देशातील नाहीत. इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गन आयर्लंडचा आहे. जेसन रॉय दक्षिण आफ्रिकेचा, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन दोन्ही वेस्ट इंडिजचे, आदिल रशिद पाकिस्तानचा तर बेन स्टोक्सचा जन्म न्यूझीलंडमधील आहे. वाचा- व्हिडिओ
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vi7t1b
No comments:
Post a Comment