अहमदाबाद: इंग्लंडविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद १५६ धावा केल्या. इंग्लंडने विजयाचे लक्ष्य २ विकेटच्या बदल्यात पार केले. इंग्लंडकडून जोश बटलरने नाबाद ८३ धावा केल्या. वाचा- भारताकडून कर्णधार ()ने शानदार ७३ धावा केल्या. विराटच्या या खेळीचे सर्वजण कौतुक करत आहेत. कारण १५ षटकात भारताची अवस्था ५ बाद ८५ अशी होती. त्यानंतर अखेरच्या पाच षटकात विराटने हार्दिकसह संघाला १५६ धावांपर्यंत मजल मारून दिली. भारताने पहिल्या ३ विकेट फक्त २४ धावांवर गमावल्या होत्या. राहुल शून्य, इशान किशन ४ आणि रोहित १५ धावांवर बाद झाला होता. त्यानंतर विराट आणि ( ) ही जोडी चांगली खेळत होती. तेव्हा पंत धावबाद झाला. वाचा- भारताच्या डावातील १२व्या षटकात विराटच्या चुकीच्या कॉलमुळे पंत धावबाद झाला. पंतने चेंडू ऑफ कट केला आणि दोन धावा घेतल्या. फिल्डरने चेंडू सीमा रेषेवरून विकेटकिपरकडे टाकला. पण तो त्याला पकडता आला नाही. तेवढ्यात विराटने तिसरी धाव घेण्यासाठी पंतला कॉल दिला. दुसरी धाव पूर्ण करून पंत विकेटच्या पुढे गेला होता. त्यामुळे जोपर्यंत विराटची हाक त्याच्यापर्यंत पोहोचली तोपर्यंत विराटने धाव घेण्यास सुरूवात केली. वाचा- इंग्लंडच्या विकेटकिपरने चेंडू नॉन स्ट्रायकरच्या दिशेने फेकला आणि पंत पोहोचायच्या आधी गोलंदाजाने चेंडू विकेटला लावला. पंतने २० चेंडूत २५ धावा केल्या. ज्या ठिकाणी तिसरी धाव घेणे शक्य नव्हते तेथे विराटने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि पंतने कर्णधाराचे कॉल दिला म्हणून धाव घेतली आणि विकेट गमावली. वाचा- जर पंतने विराटला पटकन नकार दिला असता तर भारताने विकेट गमावली नसती. पंत चांगली फलंदाजी करत होता आणि दोघांची भागिदारी मोठी झाली असती. सोशल मीडियावर चाहते या घटनेवर प्रतिक्रिया देत आहेत. विराट आणि पंत ही जोडी फुटली नसती तर भारताच्या धावा अधिक झाल्या असत्या. पंत पाठोपाठ श्रेयस अय्यर ९ धावांवर बाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3vAKLle
No comments:
Post a Comment