अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या क्रिकेट संघात सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत पहिली आणि तिसरी लढत इंग्लंडने तर दुसरी लढत भारताने जिंकली. मालिका सध्या २-१ अशा स्थितीत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिवर सुरू असलेली ही मालिका रद्द करा अन्यथा आत्महत्या करम्याची धमकी एका व्यक्तीने दिली आहे. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका रद्द न केल्यास आत्महत्या करू, अशी धमकी देणारा फोन एका अज्ञात व्यक्ताने पोलिसांना केलाय. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पोलिस अधिकारी केव्ही पटेल यांना फोन करून ही धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव पंकज पटेल असे सांगितले आणि तो गांधीनगरमधून फोन करतोय असे सांगितले होते. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिका रद्द करावी. जर मालिका रद्द केली नाही तर मी आत्महत्या करेन अशी धमकी त्याने दिली. विशेष म्हणजे पटेल नरेंद्र मोदी स्टेडियमच्या सुरक्षेची जबाबदारी पथकात आहेत. वाचा- या धमकीची ऑडिओ क्लिप देखील शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेसाठी प्रेक्षकांना काही प्रमाणात परवानगी देण्यात आली होती. पण नियमांचे पालन न होत नसल्याचे संबंधीत व्यक्तीने म्हटले होते. दरम्यान या धमकी देणाऱ्या व्यक्तीने गुजरात सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता, असे पटेल यांनी सांगितले. हा फोन झाल्या झाल्या त्यांनी संबंधित धमकीची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध कलम ५०५(२), ५०७, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दोन सामन्यासाठी ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. पण करोना रुग्णांची संख्या वाढल्याने तिसऱ्या लढतीपासून प्रेक्षकांना स्टेडियमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rUnSH2
No comments:
Post a Comment