लंडन: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि इंग्लंड (ind vs eng ) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल फक्त दोन दिवसात लागला होता. पिंक बॉल कसोटीनंतर पिचवरून अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता उद्यापासून त्याच मैदानावर चौथा आणि अखेरचा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने एक व्हिडिओ शेअर करून पिचवरून टोला हाणला आहे. वाचा- वॉनने एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तो खोदलेल्या जमीनीवर फलंदाजी करताना दिसत आहे. यासाठी त्याने चौथ्या कसोटीसाठी चांगली तयारी सुरू आहे, अशी कॅप्शन दिली आहे. तर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून ज्यात तो अशाच खोदलेल्या जमीनीवर बॅट घेऊन उभा आहे. तो म्हणतो, या खोदलेल्या जमीनीवर कशा पद्धतीने फलंदाजी करायची याबद्दल सांगतोय. तो ही पिच कसे आहे आणि त्यावर कशा पद्धतीने खेळले पाहिजे हे तिरकस पद्धतीने सांगतोय. वाचा- वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीतील पिचवरून वॉनने बरीच टीका केली होती. यावरून त्याचे आणि शेन वॉर्न यांच्यात सोशल मीडियावर बराच वाद देखील झाला होता. या दोन्ही सामन्यात फिरकीपटूंनी शानदार कामगिरी केली होती आणि भारताने विजय मिळवला होता. वाचा- आता उद्यापासून सुरू होणाऱ्या सामन्यात देखील फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी असल्याची शक्यता आहे. भारतीय संघाने दुसरा आणि तिसरा कसोटी सामना फिरकीपटूंच्या जोरावर जिंकला होता. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभी करता आली नव्हती. वाचा- भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विन यांनी ११ आणि ७ विकेट घेतल्या होत्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3sN7Wqm
No comments:
Post a Comment