नवी दिल्ली: बीसीसीआयने आयोजित केलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धा ( ) स्पर्धेत सोमवारी नवा विक्रम नोंदवला. कर्नाटकचा सलामीवीर ()ने केरळविरुद्ध झालेल्या सामन्यात १०१ धावांची खेळी केली. त्याच्या या शतकासह स्पर्धेतील शतकांच्या विक्रमाचा इतिहासच बदलला. वाचा- देवदत्तने या स्पर्धेत सोमवारी झळकावलेले सलग चौथे शतक ठरले. आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नाही. केरळविरुद्धच्या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजीकरत ३३८ धावा केल्या. यात कर्णधार रविकुमार समर्थने १९२ धावांचे योगदान दिले. तर दुसरा सलामीवीर देवदत्तने १०१ धावा केल्या. ही त्याचे स्पर्धतील सलग चौथ्या शतक ठरले. या शतकासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. वाचा- या स्पर्धेत देवदत्तने अर्धशतकाने सुरुवात केली होती. त्यानंतर गेल्या चार सामन्यात त्याने शतक केले. दुसऱ्या लढतीत त्याने बिहार विरुद्ध ९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर उडिसाविरुद्ध १५२, केरळविरुद्ध नाबाद १२६, रेल्वेविरुद्ध नाबाद १४५ आणि आज पुन्हा केरळविरुद्ध १०१ धावा करून शतकांचा चौकार मारला. या सामन्यात कर्नाटकने ८० धावांनी विजय मिळवला. देवदत्तने सहा सामन्यात १६८.२५च्या सरासरीने ६७३ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतक आणि २ अर्धशतक आहेत. वाचा- असे... एका विजय हजारे ट्रॉफीत सर्वाधिक शतकांच्याबाबत देवदत्तने आता भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. विटारने २००८-०९ साली दिल्लीकडून खेळताना चार शतक केली होती. देवदत्तने एका स्पर्धेत चार शतक करत विराटशी बरोबरी केली. देवदत्त आयपीएलमध्ये विराट कोहली नेतृत्व करत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतो. गेल्या वर्षी त्याने RCB कडून धमाकेदार कामगिरी केली होती. आता देखील तो शानदार फॉर्ममध्ये दिसत असल्याने RCBसाठी आनंदाची बातमी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kU3vXK
No comments:
Post a Comment