मुंबई: भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ने जिंकल्यामुळे त्यांनी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. ही फायनल लॉर्ड्स मैदानावर १८ ते २२ जून या काळात होणार आहे. तर याच काळात स्पर्धेचे आयोजन होणार आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरमुळे आशिया कप स्पर्धा स्थिगत करण्यात आली होती. पण या वर्षी देखील भारतीय संघामुळे ती स्थगित करावी लागू शकते. कारण आशिया कप देखील जून- जुलै महिन्यात होणार आहे. पण जर आशिया कप रद्द झाला नाही तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला या स्पर्धेसाठी दुसरा संघ पाठवावा लागू शकतो. आशियाई क्रिकेट काउंसिलचे अध्यक्षपद सध्या जय शहाकडे आहे. वाचा- न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या WTC फायनलमध्ये खेळण्यासाठी भारतीय संघाला जूनच्या पहिल्या आठवड्यात इंग्लंडसाठी रवाना झाले पाहिजे. त्यामुळे आयपीएल २०२१ संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना इंग्लंडसाठी रवाा व्हावे लागले. कारण तेथे खेळाडूंना १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लंडनमधील लॉर्ड्स नव्हे तर साउथप्टन येथील एजेस बाउल स्टेडियम या मैदानाचे आयोजन करू शकते. कारण या स्टेडियमच्या परिसरात हॉटेलची सुविधा आहे. यामुळे करोना व्हायरसच्या दृष्टीने बायो बबल वातावरण तयार करण्यासाठी आयसीसी आणि इसीबीला सोईचे ठरेल. वाचा- पण या सर्वात बीसीसीआयला एका अडचणीला सामोरे जावे लागू शकते. आशियाई क्रिकेट संघटनेने जूनच्या अखेरीस ही स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. अशात भारतीय संघातील प्रमुख खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, ऋषभ पंत हे खेळाडू उपलब्ध नसतील. वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका देखील होणार आहे. वाचा- मैदानावर सर्वाधिक सामने या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयला लंकेत होणाऱ्या आशिया कपसाठी दुसरा संघ पाठवावा लागेल. पण यात मोठे खेळाडू नसतली. हा संघ आयपीएल २०२१च्या कामगिरीच्या आधारावर तयार केली जाऊ शकते. भारताकडे या शिवाय कोणता मार्ग नसेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OtqEUW
No comments:
Post a Comment