मुंबई: भारतीय संघातील युवा फलंदाज ( ) सध्या सुरू असलेल्या ()त धमाकेदार फलंदाजी करत आहे. मुंबईचे नेतृत्व करत असलेल्या पृथ्वीने या स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. त्याने आतापर्यंत चार शतक केली असून त्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. विजय हजारे स्पर्धेच्या आधी पृथ्वी शॉ भारतीय संघात होता. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉ दोन्ही डावात शून्यावर एकाच पद्धतीने बाद झाला. त्यानंतर पृथ्वीला संघातून वगळण्यात आले. मायदेशात परतल्यावर पृथ्वी मुंबईकडून विजय हजारे स्पर्धेत उतरला. वाचा- पृथ्वीने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी सुरू केल्याने अनेकांना प्रश्न पडला की या खेळाडूच्या कामगिरीत अचानक बदल कसा काय झाला. याचा खुलासा खुद्द पृथ्वीनेच केला आहे. वाचा- ऑस्ट्रेलियात दौऱ्यात अपयशी ठरलेल्या पृथ्वीने मायदेशात आल्यावर थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. ऑस्ट्रेलियात आतल्या बाजूला येणाऱ्या येणाऱ्या चेंडूचा पृथ्वीला अडचण येत होती. सचिनने पृथ्वीला सल्ला दिला, जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त जितके शक्य असेल तितके शरीराच्या जवळ खेळ. वाचा- मी चेंडूवर वेळाने पोहोचत होतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी यावर काम केले होते. पण त्याच्या आधी दुबईत आयपीएल खेळले होतो त्यामुळे असे झाले असेल. ऑस्ट्रेलियात झालेल्या पहिल्या एडिलेड येथील कसोटीत मिशेल स्टार्कने आणि पॅट कमिन्स यांनी इनस्विंग चेंडू टाकला होता. दोन्ही वेळा पृथ्वी एकाच पद्धतीने बाद झाला. चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या मधून गेला. दोन्ही वेळा सारख्याच पद्धतीने बाद झाल्यावर पृथ्वीने देखील मान्य केले की तो कमी पडतोय. वाचा- माझी मनस्थिती ठीक नव्हती. ज्या पद्धतीने मी आतापर्यंत धावा केल्या होत्या. त्यात काही चूक होती. मी बॅट शरीराच्या जवळ ठेवली. भारतीय संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री आणि फलंदाजीचे कोच विक्रम राठोड यांनी देखील मी कुठे चूक करतोय याची जाणीव करून दिली, असे पृथ्वीने सांगितले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/30yI2KG
No comments:
Post a Comment