चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी सर्व संघांनी सराव सत्र सुरू केले आहे. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी संघ ज्यांनी खेळलेल्या एका हंगामाचा अपवाद वगळता सर्व हंगामात किमान प्लेऑफमध्ये प्रवेश केला. इतक नव्हे तर आयपीएलमध्ये सर्वाधिक फायनल खेळणारा संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज () होय. वाचा- चेन्नई संघाने घरच्या मैदानावर सराव सत्र सुरू केले आहे. या सराव सत्रात संघाचा कर्णधार () जोरदार फलंदाजी करताना दिसत आहे. त्याच्या फलंदाजीचा व्हिडिओ चेन्नई संघाने सोशल मीडियावर शेअर केलाय. वाचा- आयपीएलच्या १३व्या हंगामात चेन्नईचा संघ अपयशी ठरला होता. गुणतक्त्यात चेन्नई संघ सातव्या क्रमांकावर होता. गेल्या वर्षाचे अपयश विसरून संघ पुन्हा तयारीला लागला आहे. धोनीसह अंबाती रायडू आणि अन्य खेळाडू या सराव सत्रात सहभागी झाले आहेत. वाचा- सराव सत्रात धोनी गोलंदाजांची धुलाई करताना दिसत आहे. आगामी आयपीएलमध्ये देखील त्याने अशीच फलंदाजी करावी असे चाहत्यांना वाटते. चेन्नईची पहिली लढत मुंबईच्या वानखेडे मैदानावर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. ही लढत १० एप्रिल रोजी होईल. वाचा- चेन्नई संघात सुरेश रैनाचा देखील समावेश झाला आहे. त्याच बरोबर लिलावात त्यांनी मोइन अलीला विकत घेतले होते. या शिवाय श्रीलंकेचे दोन युवा गोलंदाज महीश थिकशाना आणि मथीशा पथिराना यांना देखील सीएसकेने सरावात सहभागी करून घेतले आहे. यातील पथिरानाच्या गोलंदाजीची स्टाइल मलिंगासारखी आहे. चेन्नईच्या लढती
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3t746Is
No comments:
Post a Comment