लखनऊ: सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या लढतीत विजय मिळून भारताने १-१ अशी बरोबरी केली. मंगळवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताने ९ विकेटनी विजय मिळवला. भारताची सलामीवीर ()ने नाबाद ८० धावा केल्या आणि संघाला मोठा विजय मिळून दिला. वाचा- आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये स्मृती मानधनाने असा विक्रम केला जो आतापर्यंत जगातील कोणत्याही क्रिकेटपटूला करता आली नाही. जागतीक क्रिकेटमध्ये महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आजवर ही कामगिरी कोणी केली नाही. दुसऱ्या वडनेत भारताने प्रथम गोलंदाजी केली आणि आफ्रिकेला १५७ धावांवर रोखले. झूलन गोस्वामी आणि राजेश्वरी गायकवाडने घातक गोलंदाजी केली. झूलनने ४, राजेश्वरीने ३ विकेट घेतल्या. त्यानंतर फलंदाजीत स्मृतीने ८० तर पूनम राऊतने ६२ धावा केल्या आणि २८.४ षटकात विजय मिळवला. वाचा- या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या स्मृतीने एक अनोखा विक्रम केला आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यत कोणत्याही महिला अथवा पुरुष क्रिकेटपटूने धावांचा पाठलाग करताना सलग १० सामन्यात अर्धशतक झळकावले नाही. स्मृतीने फक्त महिलाच नाही तर पुरुषांच्या क्रिकेटमधील सर्व दिग्गजांना मागे टाकले आहे. सलग दहा सामन्यात १० अर्धशतक करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू आहे. गेल्या १० सामन्यातील स्मृतीची कामगिरी ६७ विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १५ मार्च २०१८ ५२ विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १८ मार्च २०१८ ८६ विरुद्ध इंग्लंड- ६ एप्रिल २०१८ ५३* विरुद्ध इंग्लंड- १२ एप्रिल २०१८ ७३* विरुद्ध श्रीलंका- ११ सप्टेंबर २०१८ १०५ विरुद्ध न्यूझीलंड- २४ जानेवारी २०१९ ९०* विरुद्ध न्यूझीलंड- २९ जानेवारी २०१९ ७४ विरुद्ध वेस्ट इंडिज- ६ नोव्हेंबर २०१९ ८०* विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ मार्च २०२१ वाचा- आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने ६४ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या. यात १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तिने पहिल्या विकेटसाठी २२ तर दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागिदारी केली. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ekEZxJ
No comments:
Post a Comment