नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर ()ने विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी सुरूच ठेवली आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वीने सौराष्ट्र संघाविरुद्ध मंगळवारी झालेल्या क्वॉर्टर फायनल सामन्यात नाबाद १८५ धावा केल्या. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. वाचा- लिस्ट एच्या या शतकी खेळीत पृथ्वीने भारताचा माजी कर्णधार () आणि भारताचा विद्यमान कर्णधार () यांचा विक्रम मागे टाकला. या दोघांच्या नावावर गेल्या काही वर्षापासून हा विक्रम होता. वाचा- पृथ्वीने १२३ चेंडूत २१ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १८५ धावा केल्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. याआधी हा विक्रम भारताचा माजी कर्णधार धोनीच्या नावावर होता. त्याने २००५ साली श्रीलंकेविरुद्ध जयपूर येथे नाबाद १८३ धावा केल्या होत्या. हा विक्रम १० वर्ष त्याच्या नावावर होता. त्यानंतर विराट कोहलीने २०१२ साली पाकिस्तानने ढाका येथे १८३ धावा केल्या. वाचा- विजय हजारे स्पर्धेत पृथ्वीने आतापर्यंत एक द्विशतक आणि दोन शतकासह ५८९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद झालेल्या पृथ्वीला संघातून वगळण्यात आले आहे. त्यानंतर तो मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळत आहे. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक असून याआधी दिल्लीविरुद्ध नाबाद १०५, त्यानंतर पुड्डुचेरीविरुद्ध नाबाद २२७ तर आता नाबाद १८५ धावा केल्या आहेत. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rw4IHb
No comments:
Post a Comment