लखनऊ : मैदानावर होणाऱ्या विक्रमांचे किंवा शानदार कामगिरीचे व्हिडिओ जसे व्हायरल होत असतात तसेच गंमतीशीर घटनांचे व्हिडिओ देखील चर्चेत येत असतात. अशाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंग्लंड माजी कर्णधार मायकल वॉनने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. आशिया खंडात विशेषत: भारत, पाक, श्रीलंका, बांगलादेश तसेच इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशात ज्या स्तराचे क्रिकेट खेळले जाते त्या तुलनेत युरोप, अमेरिका या देशात अजून क्रिकेट विकसीत झाले नाही. वाचा- मायकल वॉनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्रिकेटमधील सर्वात सुमार दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. युरोपीयन क्रिकेट सीरीजमध्ये स्टॉकहोम सुपर किंग्ज संघातील फलंदाजांनी चार धावा पळून काढल्या. आता तुम्हाला वाटेल यात विशेष असे काय आहे. पण ज्या पद्धतीने या फलंदाजांनी धावा काढल्या ते पाहिल्यानंतर हसून हसून पोट दुखेल. वाचा- फलंदाजी करणाऱ्या स्टॉकहोम सुपर किंग्ज संघातील फलंदाजाने चेंडू मारला तो विकेटकिपरच्या मागे हवेत उंच उडाला. विकेटकिपर कॅच घेण्यासाठी पळत गेल. पण सोपा कॅच त्याला घेता आला नाही. कॅच सोडल्यानंतर त्याने धाव घेणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी थ्रो केला. पण चेंडू काही विकेटला लागला नाही. दोन्ही फलंदाजांनी दोन धावा पूर्ण केल्या. चेंडू फिल्डरच्या हातात नसल्याचे पाहून फलंदाजांनी तिसरी धाव देखील पूर्ण केली. पण गंमत म्हणजे नॉन स्ट्रायकर दिशेच्या फलंदाज चौथी धाव घेण्यासाठी पळाला. तेव्हा देखील विकेटच्या जवळ उभ्या असलेल्या फिल्डरला चेंडू विकेटवर मारता आला नाही. एकाच चेंडूवर फिल्डिंग करणाऱ्या संघाने तीन वेळा बाद करण्याची संधी वाया घालववली. हा व्हिडिओ शेअर करताना वॉनने Now this is proper !!! असे म्हटले आहे. वाचा- हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला प्रत्येक वेळी एखादी नवी गोष्ट दिसेल. धावा काढताना नॉन स्ट्रयकर बाजूला उभ्या असलेल्या फलंदाजाचे पॅट निघाले, त्याने तिसरी आणि चौथी धाव लंगडत काढली तरी देखील तो बाद झाला नाही. या व्हिडिओवर सोशल मीडियावर अनेक गंमतीदार प्रतिक्रिया येत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2N9Ywpw
No comments:
Post a Comment