लखनऊ : भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार फलंदाज ( )ने शुक्रवारी इतिहास घडवला. ३८ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली तर जगातील फक्त दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मितालीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या वनडेत हा विक्रम केला. वाचा- आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे झालेल्या सामन्यात मितालीने ३५ धावा करताच १० हजार धावांचा टप्पा पार केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम १० हजार धावाचा विक्रम इंग्लंडच्या चार्लेट एडवर्ड्सने केला होता. चार्लेटला मागे टाकण्यासाठी आता मितालीला २९९ धावांची गरज आहे. वाचा- या सामन्यात मितालीला फार धावा करता आल्या नाही. ती ३६ धावांवर बाद झाली. मितालीने वनडेत सर्वाधिक ६ जार ९७४ धावा केल्या आहेत. वनडेत ७ हजार धावा करण्यासाठी तिला फक्त ३६ धावांची गरज आहे. तिने ८९ टी-२० सामन्यात २ हजार ३६४ धावा तर १० कसोटीत ६३३ धावा केल्या आहेत. वाचा- आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत मितालीने पूनम राऊत सह ७७ धावांची भागिदारी केली. भारताची अवस्था २ बाद ६४ असताना या दोघांनी डाव सावरला. पूनमने सर्वाधिक ७७ धावा केल्या. भारताने ५० षटकात ५ बाद २४८ धावा केल्या आहेत. वाचा- पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा स्थितीत आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38y6m3Q
No comments:
Post a Comment