अहमदाबाद: इंग्लंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतापुढे विजयासाठी १६५ धावांचे लक्ष्य दिले होते. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि () यांनी केली. पण पहिल्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर राहुल शून्यावर बाद झाला आणि टीम इंडियाला मोठा झटका बसला. पहिल्या सामन्यात पराभव झालेल्या भारतीय संघाला या सामन्यात विजय गरजेचा होता. आंतरराष्ट्रीय पदार्पणातच आव्हानात्मक धावसंख्या पार करण्याचे आव्हान इशान किशनकडे होते. सोबत अनुभवी आणि दिग्गज असा विराट कोहली होता. सर्वांचे लक्ष्य विराट कसा खेळेल याकडे असताना इशानने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. वाचा- इशानने विराट कोहली सोबत फक्त ५६ चेंडूत ९४ धावांची भागिदारी करून संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ३२ चेंडूत धमाकेदार ५६ धावा करत सामनावीर पुरस्कार पटकावला. पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणारा तो दुसरा भारतीय ठरला. भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या इशानने फक्त देशाला विजय मिळवून दिला नाही तर एक अशी कृती केली ज्याने सर्व चाहत्यांचे मन जिंकले. इंग्लंडविरुद्ध भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ७३ धावा केल्या. सामनावीर पुरस्कार त्याला मिळेल असे वाटले होते. पण पदार्पणात शानदार शतक करून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या इशांतची निवड या पुरस्कारासाठी केली गेली. पदार्पणात सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो सातवा भारतीय ठरला. वाचा- इशानने भारतीय संघात निवड झाल्यानंतर स्वत:ला सिद्ध करून दाखवले. त्याने देशाला विजय मिळवून दिला. तो एवढ्यावर थांबला नाही. सामनावीर पुरस्कार एका खास व्यक्तीला समर्पित केला. इशांतने त्याच्या प्रशिक्षकांच्या वडिलांना समर्पित केला. त्याचे काही दिवासंपूर्वी निधन झाले होते आणि माझी आजची खेळी ही त्यांच्यासाठी होती असे इशान म्हणाला. सामन्याआधी प्रशिक्षक म्हणाले होते की, माझ्या वडिलांसाठी तुला किमान अर्धशतक करावे लागले. त्यामुळे हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करतो. इशानच्या या कृतीने सर्व क्रिकेट चाहत्याचे मन जिंकले. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहेत. वाचा- कर्णधार विराटने केले कौतुक
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OQT2Aw
No comments:
Post a Comment